spot_img
spot_img

खा सुजय विखे पा. यांच्या शुभहस्ते 601 घरकुल योजनेचा शुभारंभ ,बांधकाम कामगार गृहउपयोगी वस्तूचे वितरण

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव ग्रामपंचायत येथे मंजूर झालेल्या सहाशे एक घरकुल योजनेचा शुभारंभ खा सुजय विखे पा यांच्या हस्ते व शेती महामंडळ कार्यालय पाठीमागे हरीगाव ब्राह्मणगाव रोड येथे झाला तसेच नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी गुरुपयोगी वस्तूचे वाटप माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तसेच 601 घरकुल योजनेचा शुभारंभ व भूमिपूजन खा विखे यांनी केले.

त्यावेळी मा.खा सुजय विखे पा यांनी प्रतिपादन केले की आज हरीगाव येथील अनेक वर्षांपासून सर्वसामान्य नागरिकांना घरकुलासाठी जागा वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा. नितीन दिनकर मा. दीपकअण्णा पटारे मा, बाबासाहेब चिडे ,शरद नवले गणेश मुदगुले गिरीधर आसने महेंद्र पठारे ,कांगुणे आदी ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे मनपूर्वक स्वागत अनेक वर्षांपासून प्रत्येक प्रश्नाला संघर्ष करावा लागत असे कोणत्याही प्रश्नसाठी आंदोलनाची भूमिका घ्यावी लागत असे हक्काचे घर पाहिजे तरी आंदोलन ‘डोल पाहिजे तरी आंदोलन उसाला भाव पाहिजे.

तरी आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे तरी आंदोलन,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा पाहिजे तरी आंदोलन घरकूल मध्ये नाव पाहिजे म्हणून आंदोलन अशा 25 वर्षाच्या भूमिके नंतर इथे असलेल्या अनेक लोकप्रतिनिधी याना संधी दिली तरी त्यांनी जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत ज्यांनी श्रीरामपूर शहरात अनेक पदावर काम केले त्यांना वेगवेगळ्या सत्ता दिल्या 25 वर्षात त्यांचेकडून कोणताही प्रश्न सुटला नाही म्हणून श्रीरामपूर तालुक्यात सुजय विखे यांची एंट्री झाली.यात माझा काही स्वार्थ नाही.आता श्रीरामपूर नगरपालिका असेल ग्रामीण भाग असेल पुढील चार वर्षात एकही प्रश्न सुजय विखे मोकळा सोडणार नाही यांची सुरुवात श्रीरामपूर येथे आकरीपंडित खंडकऱ्यापासून केली.ते जमिनीसाठी लढत होते त्याचा प्रश्न ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हातात घेतला व वर्षात तो पण मार्गी लागेल ही 15 वी ग्रामपंचायत असेल जिला आज दहा कोटी रु.ची जमीन घरकुलासाठी मोफत दिली आहे.

आज येण्यापूर्वी शिर्डी येथे रु 200 कोटीची जमीन तीनशे लोकांना वाटून येथे आलो आहे .येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत प्रश्न राहील इथे उद्योजक यायला तयार नाही .श्रीरामपूरसाठी केलय काय ?तालुक्याचा विकास व्हायचा असेल,तुम्हाला नोकऱ्या पाहिजे असतील सुरक्षितता पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटील परिवाराच्या नावाशिवाय पर्याय नाही याना 40 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जागा देता आली नाही सुजय विखेंनी सहा महिन्यात पुतळा आणला व त्याचे उदघाटन नुकतेच झाले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा प्रलंबित प्रश्न त्यासाठी शिष्टमंडळ भेटले ते पण 29 वर्षांपासून प्रयत्न करतात तो प्रश्न सहा महिन्यात सोडवला त्यासाठी दीड कोटी रु मंजूर केले तुम्ही विकासाच्या पाठीमागे उभे राहा महायुतीच्या मागे उभे रहा असे आवाहन करतो

प्रास्ताविक व स्वागत माजी सरपंच दिलीप त्रिभुवन यांनी केले त्यावेळी भाऊसाहेब बांद्रे आदींनी मनोगत व्यक्त केले अध्यक्षपदाची सूचनेला रमेश भालेराव यांनी अनुमोदन दिले व्यासपीठावर माजी सभापती दीपक पटारे,जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, अनिल भनगडे दिलीप त्रिभुवन रमेश भालेराव भाऊसाहेब बांद्रे डॉ शंकरराव मुठे गिरीधर आसने शरद नवले बाबासाहेब चिडे ,गणेशराव मूदगुले नानासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!