spot_img
spot_img

महाराजांच्या स्मारकावरून वाद होणे हाच नतद्रष्टपणा-ना. राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या जागेवरून वाद घालणे हाच नतद्रष्टपणा होता.राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर स्मारक उभारण्याचे स्वप्न पूर्ण झाले.भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचेही भव्य स्मारक उभे राहील.येत्या सहा महीन्यात विकास प्रक्रीयेच्या माध्यमातून शहराचा चेहरा मोहरा बदलेल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत अशोक बॅकेचे माजी चेअरमन नारायणराव डावखर पहील्या माजी नगराध्यक्षा इंदूमती डावखर गजेंद्र डावखर रवि गुलाटी हेमा गुलाटी राजेश अलग यांच्यासह अनेकांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यांचे सर्वाचे स्वागत करून अभिनंदन केले.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर दिलीप भालसिंग दिपक पठारे संजय फंड आशिष धनवटे श्रीनिवास बिहाणी जितेंद्र छाजेड बाबासाहेब चेडे केतन खोरे रवी पाटील स्वाती चव्हाण पुष्पाताई हरदास शरद नवले नानासाहेब शिंदे गिरीधर आसने आदी उपस्थित होते.

याप्रसंगी बोलतांना मंत्री विखे पाटील म्हणाले की,पक्ष संघटनेला महत्व आहे.सर्वाच्या पाठीशी पक्षाची ताकद असल्यामुळे प्रतयेकजण इथे मोठा आहे.व्यक्तिला नाही तर संघटनेला महत्व असल्याचे सांगून विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वाच्या सहकार्याने जिल्ह्याच्या विकासाला गती मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.

शहारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की चाळीस वर्षे लागली.मात्र महायुती सरकार आल्यामुळे स्मारकाचे स्वप्न पूर्ण होवू शकले.अनेक वर्ष फक्त जागेवरून वाद झाले.महाराजांच्या स्मारकावरून वाद होणे हाच नतद्रष्ट पणा असल्याचा उल्लेख केला.

श्रीरामपूर शहारातील नाॅर्दनब्रॅच कालव्याचे नूतनीकरणाचे काम सुरू झाले असून येत्या सहा महीन्यात विकासाच्या माध्यामातून शहराचा चेहरा मोहरा बदललेला दिसेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.भाररत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी निधी यापुर्वीच मंजूर झाला असून भव्य स्मारक लवकर उभे राहील.

दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाच्या निमित्ताने हिंदी मराठी गाण्याची मैफल आयोजित करण्यात आली होती.यातील काही कलाकार संगमनेचे असल्याचा उल्लेख करून संगमनेरात फार चांगले कलाकार असल्याचा मिश्कील टिपणी करून स्नेहमिलन कार्यक्रमात आज मिसळ संगमनेरची आणि पाव लोणीचे असल्याचे उल्लेख केला.कार्यक्रमास शहर आणि तालुक्यातील कार्यकर्ते विविध संस्थां संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!