कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा ):- कोल्हार खु येथील मुकुंदराव सखदेवराव राजभोज यांच्या तांभेरे रोड लगत असलेल्या राहत्या घरी शुक्रवारी रात्री 10.30 वा. पाळीव कुत्र्यावर हल्ला करत त्याला उचलून नेल्याचे आढळून आले.
राहत्या घरी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला असल्याने या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले.
त्यामुळे गावात तसेच परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
सदर बिबट्याला लवकरात लवकर जेर बंद करून भविष्यात होणारी जिवीतहानी टाळण्याची मागणी मुकुंद राजभोज तसेच परिसरातील ग्रामस्थांनी वन विभागाला तसेच प्रशासनाला केली आहे.



