श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): – मी जे बोलतो ते करून दाखवतो पाहतो करतो बोलतो असे आश्वासने मी देत नाही .श्रीरामपूर शहरातील रस्ते, पाणी, अतिक्रमण, घरकुल आणि समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून देऊ नगरपालिकेवर भगवा फडकवा तुमची सर्व प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते तसेच सर्व प्रभागातील 32 उमेदवार यांच्या प्रचारार्थ मेन रोडवर श्रीराम मंदिर चौकात झालेल्या जाहीर सभेत शिंदे बोलत होते.अध्यक्षस्थानी माजी खासदार सदाशिव लोखंडे होते.व्यासपीठावर माजी आमदार भानुदास मुरकुटे भाऊसाहेब कांबळे यांचे सह शिवसेनेचे पदाधिकारी,संत,महंत उपस्थित होते.
आपल्या प्रमुख भाषणात एकनाथ शिंदे पुढे म्हणाले कि, अडीच वर्ष मी मुख्यमंत्री होतो.मला आठवतंय मी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र फिरलो.लोकं विचार करायचे हा झोपतो कधी, उठतो कधी, जेवतो कधी, पण मी आपल्याला सांगतो मी अडीच वर्ष फक्त तीन तासाच्यावर झोपलो नाही. पहाटे पाच वाजेपर्यंत कामे केली.
विरोधकांची झोप उडवण्यासाठी माझा जन्म झालेला आहे.आपल्याला सांगतो एकीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना दुसरीकडे विकास आणि अनेक प्रकल्प आपण मार्गी लावले.महाविकास आघाडीच्या काळामध्ये सगळे बंद पाडले होते. सगळे थांबवले होते.पण आपण अनेक योजना राबवल्या सर्व योजना बद्दल माहिती द्यायची ठरले तर रात्र पुरणार नाही.
शेतकऱ्यांना देखील कर्जमाफी करणार म्हणून आम्ही निर्णय घेतला.त्याची देखील प्रक्रिया सुरू आहे. जे करणार तेच बोलणार,जे होणार नाही ते बोलणार नाही आणि म्हणून एकदा शब्द दिला म्हणजे ती पूर्ण करायची जबाबदारी माझी.बाळासाहेब सांगायचे शब्द देताना शंभर वेळा विचार करा पण एकदा शब्द दिला की माघार नाही. तुम्ही 2022 ला बघितलं एकनाथ शिंदेने एकदा पाऊल उचललं की माघार नाही सरकार पलटी करून महाराष्ट्रामध्ये जनतेच्या मनातलं सरकार आपण आणलं.
एकनाथ शिंदेने उठाव केला आणि या महाराष्ट्रामध्ये सरकार आणले.तमाम माता भगिनींच्या मनातलं सरकार आणलं आणि लोकांनी स्वीकारलं .
मला आठवतंय की मुख्यमंत्री झाल्या झाल्या आषाढी एकादशीची पूजा पंढरपूरला होती.माझ्या हस्ते,मला वाटलं लाखो वारकरी पंधरा-वीस लाख वारकरी यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय असेल सरकार बदलवले आपण सरकार उलटवून टाकले माझ्या मनामध्ये काय होतं वारकऱ्यांच्या मनात माझ्याबद्दलकाय आहे हे जाणून घेण्यासाठी पूजा केल्यानंतर जसा मी बाहेर पडलो वारकऱ्यांनी एकच हल्ला कल्ला केला आणि जोर जोरात घोषणा देऊन माझे स्वागत केलं आणि तेव्हा मला वाटलं की आपण घेतलेला निर्णय हा महाराष्ट्राच्या हितासाठी घेतला.
मी बोलतो ते करून दाखवतो. एकदा कमिटमेंट केली कि मग पलटी मारत नाही .*एक बार मैने कमिटमेंट कर दी तो फिर मै खुद की भी नही सुनता 50 आमदार आले कसे माझ्याबरोबर, कसा विश्वास ठेवला एका सर्व सामान्य कार्यकर्त्यावर, कारण मी शब्दाला जागणारा आहे. शब्द कधी पडू देणार नाही.अनेक योजना केल्या.अनेक विकासाचे प्रकल्प पुढे गेले. बाळासाहेब ठाकरे समृद्धी हायवे पूर्ण केला. श्रीरामपूर वरून त्याला कनेक्टर पाहिजे एमएसआरडीसी कडे म्हणजे माझ्याकडेच ते खाते आहे. ते कनेक्टर जोडून आपण देऊ .
लोकशाहीमध्ये कुणाच्याही नावावर कायम सातबारा लिहिलेला नसतो. तो सातबारा लिहिण्याचे काम जनता करत असते.जनता ठरवत असते कुणाला तिथे सत्तेवर बसवायचं. तुमचं एक मत इतिहास घडवू शकतो आणि श्रीरामपूरचा कायापालट करू शकता. परिवर्तन घडवू शकतो. श्रीरामपूरची जनता प्रस्थापितांना जे अनेक वर्ष होते, त्यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्याला मी एवढंच सांगतो ही निवडणूक अगदी सोप्या पद्धतीने घेऊ नका. डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं. तुम्ही एवढा वेळ तिथे थांबू शकता यावरून तुम्ही समोरच्या सगळ्या लोकांच्या डिपॉझिट जप्त करू शकता त्यांचा डब्बा गोल करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे.
सोन्याचा चमचा चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नसलो तरी या महाराष्ट्रातल्या सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला हे मी अभिमानाने सांगतो. श्रीरामपूर मध्ये प्रस्थापितांना त्यांची जागा दाखवण्याची संधी आपल्या हातात आली आहे आणि म्हणून विस्थापितांचा आवाज बनवून प्रकाश चित्ते तुमच्यासमोर उभा आहे . त्यांना सहकार्य करा .
माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस शाखाप्रमुख ते राज्याचा मुख्यमंत्री झाला हे देखील काही लोकांना पटलं नाही. हजम झालं नाही. पोटदुखी अजून सुरू आहे. तीन वर्षापासून सातत्याने हा घटनाबाह्य मुख्यमंत्री, हे घटनाबाह्य सरकार, हे आज पडणार, उद्या पडणार ,परवा जाणार असे सांगत बसतात .पण आम्ही आमचा कालावधी पूर्ण करणार असे त्यांनी ठणकावून सांगितले.
एकनाथ शिंदे काम करत राहिला मी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर दिले नाही मी कामातून उत्तर दिलं कामातून आणि म्हणून या ठिकाणी या राज्यांमध्ये महायुतीचे सरकार भक्कमपणे आहे.
श्रीरामपूर शहरासाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून पाणीपुरवठ्यासाठी 178 कोटी रुपये दिले, रस्त्यासाठी 20 कोटी रुपये दिले. नगर विकास विभागाच्या माध्यमातून जी दुकाने तोडलेली आहे बाजारपेठ तोडलेली आहे त्यांचा देखील पुनर्वसन केल्याशिवाय हा एकनाथ शिंदे थांबणार नाही.
भुयारी गटारी योजना याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी लावू. 65 कोटीची योजना होती.भ्रष्टाचार्य लोकांनी त्यात पैसे लाटले.हे पैसे पैसे लोकांचे आहे. या भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे.दोषी असतील त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. श्रीरामपूर तुम्हाला भ्रष्टाचार मुक्त, प्रदूषण मुक्त पाहिजे.ते आपण करू. चांगले रस्ते पाहिजे बंदिस्त पाईप मधून पाणी मिळाले पाहिजे.
रस्ते चांगले करू झोपडपट्टी नियमित करू. श्रीरामपूर चा विकास हा प्रत्येकाचा ध्यास असला पाहिजे. ऑपरेशन कोणाचं औषध कुणाला इंजेक्शन कोणाला ते मला माहित आहे. पण विकासासाठी जे जे काय करायचं त्याला लागणारे पैसे कमी पडू देणार नाही हा शब्द मी तुम्हाला द्यायला आलो आहे असे सांगून प्रकाश चित्ते आणि नगरसेवक पदाचे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले .
प्रास्ताविक भाषणात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांनी श्रीरामपूरच्या राजकारणाचा पाढा वाचला . शेवटी अशोक उपाध्ये यांनी आभार मानले .
श्रीरामपूरला समृद्धी महामार्गाशी कनेक्टिव्हिटी देणे,श्रीरामपूर येथील रस्त्यांच्या विकासासाठी तसेच बेघरांना घरासाठी निधी देणे, नगर विकास खात्याच्या संबंधित सर्व कामांना निधी देण्याचे आश्वासन देतानाच जिल्ह्याच्या मागणीबाबत मात्र बगल देत आचारसंहिता असल्याने याबद्दल जास्त बोलू शकत नाही असे सांगितले.



