कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- कोल्हार खुर्द येथील तांबेरे रोड अलगत असलेल्या उद्योजक मुकुंद राजभोज यांच्या राहत्या घरून बिबट्याने पाळीव कुत्र्याला पळविले असल्याची बातमी करून वन विभागाला भविष्यात होणारी जीवित हानी टाळण्यासाठी तिथे पिंजरा लावण्याचे आवाहन केले होते.
त्याच धर्तीवर येथील स्थानिक नागरिकांच्या मागणीवरून पिंजरा लावण्यात आला होता.कोल्हार खुर्द येथील शिरसाट घोगरे वस्तीवरील अतुल आप्पासाहेब माळवदे यांच्या शेतामध्ये पिंजरा लावून अंदाजे ७ वर्ष वय बिबट्या (मादी )जेरबंद करण्यात वनरक्षक दलाला यश मिळाले. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली काल कोल्हार खुर्द येथे पिंजरा लावण्यात आला होता.अजून आणखी दोन-तीन बिबटे असल्याचा अंदाज व्यक्त करत उद्याही आपण या परिसरात पिंजरा लावणार असल्याचे सहाय्यक उपवनसंरक्षक गणेश मिसाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
वनक्षेत्रपाल दत्तात्रय साळुंखे वनपाल लक्ष्मीकांत शेंडगे वनरक्षक संदीप कोरके, निलेश जाधव,बाळू आटोळे,ज्ञानेश्वर कडनर, बाळासाहेब दिवे,वाहन चालक ताराचंद गायकवाड, रेस्क्यू टीमचे अनिल जाधव तसेच स्थानिक ग्रामस्थअनिकेत शिरसाठ,तन्मय घोगरे,प्रणव कदम,सचिन शिरसाठ, प्रज्वल कदम,राहुल शिरसाठ , बाळासाहेब मधे यांनी मोलाचे सहकार्य केले.



