श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा): – नगरपालिका निवडणुकीमध्ये शेवटच्या टप्प्यात मोठा टवीस्ट निर्माण झाला असून जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणुका 20 डिसेंबर पर्यंत स्थिती झाले आहेत यामध्ये श्रीरामपूर नगरपालिकेतील प्रभाग क्रमांक तीनचा एका जागेचा देखील समावेश आहे .
प्रभाग तीन मध्ये अनुसूचित जातीचे संघामध्ये राष्ट्रवादी भाजप आघाडीच्या उमेदवार अनिता ढोकणे यांच्या अर्जाला विरोधी काँग्रेस पक्षाच्या रागेश्वरी रितेश एडके यांनी हरकत घेतली होती सदरचा मुद्दा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्यानंतर त्यांनी आपला कोर्टात प्रकरण दाखल केले त्यावर कोर्टाने निर्णय देऊन या जागेची निवडणूक स्थगित केली आहे.
त्यामुळे प्रभाग तीन मधील अ आणि ब जागे पैकी अशी निवडणूक पुस्तके झाल्याने ब जागेवरील सर्वसाधारण महिला गटातील उमेदवार माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक व कांचन सानप यांच्यामधील लढत मात्र होणार आहे त्यासाठी दोन तारखेला मतदान देखील होणार आहे त्यामुळे आता प्रभाग तीन मध्ये नगराध्यक्षपदाचा एक आणि नगरसेवक पदाच्या एक अशा दोन पदांसाठी मतदान होणार आहे त्यामुळे या ठिकाणी मतदारांना सध्या दोन मते देण्याचा अधिकार आहे. न्यायप्रविष्ठ प्रकरणातील प्रभाग तीन अ या जागेची निवडणूक नंतर होणार आहे.



