श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज ०२ रोजी मतदान होत आहे.याची मतमोजणी उद्या ०३ डिसेंबर रोजी पूर्वीच्या निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार होणार होती.परंतु आता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक मतमोजणीची तारीख बदलली असून मतमोजणी त्यानुसार २१ रोजी डिसेंबर रोजी होईल.
दरम्यान दि.२० डिसेंबर रोजी राहिलेल्या काही नगरपालिकेसाठी मतदानानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल असे नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत.
आज होणाऱ्या आठ नगरपालिका व नगरपरिषद यांचे निकाल 21 डिसेंबरला मतमोजणी होणार.



