मुंबई (जनता आवाज वृत्तसेवा) : – जर्नलिस्ट असोसिएशनच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी दैनिक जनता आवाज वृत्तपत्राचे संपादक अजित मोरे यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई येथे जर्नलिस्ट असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. सदर बैठक संघटनेच्या नॅशनल प्रेसिडेंट ॲड. स्मिता चिपळूणकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली व सहकाऱ्यांच्या उपस्थितीत जनता आवाजचे संपादक अजित मोरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या तसेच संघटन बांधणीत मोलाचे योगदान देणाऱ्या ॲड. स्मिता चिपळूणकर मौलिक मार्गदर्शन केले. पुढे त्या म्हणाल्या की, जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविणे, संघटना अधिक मजबूत करणे व पत्रकारितेचा दर्जा उंचावणे या दृष्टीने काम करण्याचा संदेशही त्यांनी दिला.
यावेळी ॲड. स्मिता चिपळूणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोरे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील उज्ज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली जर्नलिस्ट असोसिएशन अधिक सक्षम होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष अजित मोरे यांची निवड झाल्याने त्यांचे अहिल्यानगर जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय व धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदनाचा वर्षांव केला आहे.



