राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):- पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राहाता नगरपरिषदे वरील आपली पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. आज जाहीर झालेल्या निकालात भाजप-शिवसेना महायुतीने नगराध्यक्ष पदासह २१ पैकी तब्बल २० जागा जिंकून विरोधकांचा धुव्वा उडवला आहे. नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या निवडणुकीत भाजपचे डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी ४५१९ मताधिक्याने विजय मिळवत शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान पटकावला आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विजयी उमेदवाराचे अभिनंदन केले असून शहरातून महायुतीच्या विजयाची गुलाल उधळण करीत सवाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली .
यावेळी जलसंपदामंत्री विखे विरोधकांसाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे, कारण राहाता नगरपालिका शहर विकास आघाडीला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. या आघाडीचे नगरसेवक उमेदवार शशिकांत लोळगे हे एकमेव उमेदवार विजय मिळवू शकले. ना विखे पाटील व माजी खासदार डॉ सुजय विखे यांच्या नेतृत्वाखालील या एकतर्फी विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा जल्लोष पाहायला मिळत असून, राहाता शहराच्या सत्तेवर आता पूर्णपणे ‘कमळ’ आणि ‘धनुष्यबाण’ यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे.
सकाळी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये १० वा. मतमोजणी प्रारंभ झाला अवघ्या १ तासात मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निकाल जाहीर करण्यात आला.यावेळी नगर परिषदेच्या प्रांगणात मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत जल्लोष केला व फटाक्यांची आतषबाजी करीत गुलाल उधळत केली सकाळी १० वाजता प्रमुख निवडणूक अधिकारी मनीषा राशिनकर यांनी सर्व उमेदवारांच्या साक्षीने स्ट्रॉंग रूम ओपनकरीत मतपेट्या निवडणूक कक्षात आणल्या होत्या .
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व त्यांना मिळवलेले मतदान पुढील प्रमाणे…….
डॉ. स्वाधीन किसनराव गाडेकर भाजपा महायुती ९४५९ (विजयी), प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवार.. धनंजय श्रावण गाडेकर. लोकक्रांती सेना (४९४०), भानुदास बकाजी गाडेकर १९२, बाळासाहेब गिधाड १७३, अनिल पावटे५०, तुषार सदाफळ १७६, रामनाथ सदाफळ १०६, (नोटा ६१.)
विजयी नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. स्वाधीन गाडेकर हे ४५१९ मताधिक्याने विजयी झाले.
नगरसेवक पदाचे महायुतीचे भाजप व शिवसेना शिंदे गटाचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते खालील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १ /अ)/नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ,
पूजा गिधाड १००९, प्रभाग १/ब) सर्वसाधारण प्रवीण सदाफळ १०६५, प्रभाग,२/अ) अनुसूचित जमाती महिला . रवीना माळी ९०५, प्रभाग२/ब )सर्वसाधारण अरुण आग्रे ८६४, प्रभाग ३/अ) अनुसूचित जाती महिला , पुष्पा आरणे ११०६, प्रभाग ३/ब) सर्वसाधारण , राहुल सदाफळ ११४६, प्रभाग ४ अ) अनुसूचित जाती महिला अर्चना निकाळे ८३५ , प्रभाग ४/ब) सर्वसाधारण विजय सदाफळ ७६२, प्रभाग ५/अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग दशरथ तुपे ६३३, प्रभाग५/ब )सर्वसाधारण महिला सविता सदाफळ ५१२, प्रभाग६/अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग संदीप मुर्तडक (शिवसेना) ९३४,६/ब) सर्वसाधारण महिला मंगल डांगे (शिवसेना) ८४१,७/अ) सर्वसाधारण महिला अंजली सदाफळ ९८६, प्रभाग ७/ब सर्वसाधारण रफिक ( मुन्नाभाई) शहा५०१, प्रभाग ८/अ) अनुसूचित जाती ऋषिकेश पाळंदे ५७१, प्रभाग ८/ब सर्वसाधारण महिला अनिता शेळके ६८६, प्रभाग९ अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- शितल बनकर ९६९, प्रभाग १०/अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला नीता गाडेकर १०२९, प्रभाग १०/ब सर्वसाधारण नितीन गाडेकर १०९९,विरोधी पक्षाचे लोकक्रांती सेनेचे एकमेव विजयी उमेदवार शशिकांत लोळगे (६९०)हे प्रभाग क्रमांक ९ ब) मधून विजय झाले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत संपन्न झाली मुख्य निवडणूक अधिकारी मनीषा राशिनकर, सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार अमोल मोरे, मुख्याधिकारी वैभव लोंढे, नायब तहसीलदार हेमंत पाटील यासह पालिकेचे सर्व कर्मचारी यांनी निवडणूक प्रक्रिया व्यवस्थित पार पाडली. तसेच राहता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, लोणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ तसेच सर्व पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
हा विजय भाजपाचा असून मी हा विजय राहाता येथील जनतेला समर्पित करतो, राज्याचे लाडके मुख्यमंत्री यांनी नेहमी भक्कम साथ दिल्याने आम्हाला विकास कामाला गती देता आली, डॉ सुजय विखे यांनी शिर्डी व राहाता नगरपरिषदेत सुरुवातीपासून लक्ष देत सर्व उमेदवार निवडून आणले त्यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो.
राधाकृष्ण विखे,
जलसंपदा मंत्री महाराष्ट्र
.



