झरेकाठी (जनता आवाज वृत्तसेवा):- संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील,श्रीकांत दाभाडे .यांच्या घरामध्ये कोब्रा जातीची नागिन सुमारे सात ते आठ फुटापेक्षा जास्त असू शकते.ही बातमी गावात पसरल्यानंतर या कोब्रा नागिनला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याठिकाणी अंदाजे उंदीर,बेडूक म्हणजेच अन्नाच्या शोधामध्ये आली असल्याचे बोलले जात आहे.,
कोब्रा नागिन दिसल्यानंतर श्रीकांत महाराज दाभाडे यांनी आश्वी खु. येथील सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांना संपर्क करून घटनेची माहिती दिली .
सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांनी झरेकाठी येथे येऊन. त्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळण्यात यश आले. .
याप्रसंगी कुठल्याही प्रकारची दुर्दैवी घटना घडली नाही, याबद्दल झरेकाठी येथील जनसेवा युवा मंचचे सदस्य , रमेश डोळे, तुषार वाणी , प्राध्यापक गणेश वाणी, पैलवान विजय वाणी, रवींद्र वाणी, सोमनाथ डोळे, स्वप्निल वाणी,यांनी सर्पमित्र शिवप्रसाद पवार यांचे आभार व्यक्त करून अभिनंदन केले.



