spot_img
spot_img

आ. हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांच्या पुढाकारातून श्रीरामपुरातील मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू 

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- श्रीरामपूर शहरात मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते नगरपालिका निवडणूक संपताच आमदार हेमंत ओगले आणि लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाने यांनी नगरपालिका अधिकाऱ्यांना सूचना देत खड्डे बुजवण्याचे आदेश दिलेत लगेचच नगरपालिकेने मुख्य रस्ता असलेल्या मेन रोडवरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम चालू झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

यावेळी बोलताना आमदार ओगले म्हणाले की, निवडणुकीतील राजकीय मतभेद बाजूला ठेवून श्रीरामपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असून लोकनियुक्त नगराध्यक्ष करण ससाणे यांना सोबत घेऊन शहरातील महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार असल्याचे म्हटले आहे.

नगराध्यक्ष ससाने म्हणाले की, श्रीरामपुरातील रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असून यासाठी आमदार हेमंत ओगले यांच्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. सध्या शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडलेले आहेत त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याने तात्पुरत्या स्वरूपात मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या सूचना पालिका अधिकाऱ्यांना दिले असल्याचे सांगितले.

यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, पंडीतमामा बोंबले, नगरसेवक राजेंद्र पवार, योगेश जाधव, अहमदभाई जहागिरदार, दिपक वमने, दिपक चव्हाण, अशोक उपाध्ये, बिट्टू कक्कड,रवि खिल्लारी, कांतीशेठ पटेल, सुभाष पोटे,सागर भागवत, प्रसाद चौधरी, अभिजित लिप्टे, सिद्धार्थ लिप्ते, विलास लबडे, प्रविण नवले, अशोक शिवरकर, रियाज पठाण यांच्यासह आदि उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!