अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केडगावात मोठी बातमी समोर आली आहे भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या उपस्थितीत केडगावात दोन महत्त्वाचे प्रवेश झाले. यामध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांचा समावेश असल्याने स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यांच्या प्रवेशामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
याचवेळी विजु पठारे यांनीही प्रवेश करत आपली भूमिका स्पष्ट केली. या दोन्ही प्रवेशांमुळे केडगावातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, आगामी मनपा निवडणुकीत याचे पडसाद उमटतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, पुढील काळात आणखी हालचाली वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
केडगावात झालेल्या या घडामोडीनंतर राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक अमोल येवले यांचा भाजपमध्ये प्रवेश झाल्याने पक्षाची स्थानिक पातळीवरील ताकद वाढणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रभाग क्रमांक १६ मधून उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप अधिक आक्रमक पवित्र्यात उतरल्याचे चित्र असून, येत्या मनपा निवडणुकीत हा प्रभाग निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



