spot_img
spot_img

थोड्या पराभवाने खचायचे नाही; जिल्हा परिषदेत शतप्रतिशत भाजपचा निर्धार – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- नगर पालिका निवडणुकीत जनतेने दिलेले पाठबळ मोठे असून, त्या विश्वासाची पूर्तता करणे ही आपली जबाबदारी आहे. पक्षाचा जनाधार वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या अल्प पराभवामुळे खचून न जाता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शतप्रतिशत भाजपचा विजय मिळवू, असा विश्वास जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

श्रीरामपूर शहरात नवनिर्वाचित नगरसेवक तसेच पराभूत उमेदवारांचा सत्कार कार्यक्रम विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, बाबासाहेब चेडे, दीपक पठारे, संजय फंड, नगरपालिकेच्या गटनेत्या वैशाली चव्हाण, अनुराधा आदिक, श्रीनिवास बियाणी, शरद नवले, नानासाहेब पवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

विखे पाटील म्हणाले, श्रीरामपूरमध्ये प्रथमच भाजप स्वबळावर जनतेसमोर गेला. विकासाची स्पष्ट भूमिका मांडल्यामुळेच जनतेचा पाठिंबा मिळाला. काही प्रभागांमध्ये अत्यंत थोड्या मतांनी पराभव झाला असून, तो पराभव मानण्यासारखा नाही. काही ठिकाणी जाणीवपूर्वक मते न दिल्याचा अनुभव लोकसभेपासून येत आहे. मात्र अल्पसंख्याक समाजाला विकासापासून कधीही दूर ठेवले नाही. शिर्डी–राहाता येथे सत्तेतील पद त्या समाजाला देण्याची भूमिका याचाच भाग असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने नव्या उमेदीने काम करावे लागेल, असे सांगताना त्यांनी झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा निर्धार व्यक्त केला. शेती महामंडळाची जागा घरकुल योजनेसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून, काही कारणांमुळे विलंब झाला असला तरी काम मार्गी लागेल. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम पूर्ण झाले असून, पुढील टप्प्यात अकृषी पडीत जमिनीचा प्रश्न सोडवून औद्योगिक प्रकल्प आणले जातील. यातून युवकांसाठी रोजगारनिर्मितीला प्राधान्य देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात नगरपालिका व महापालिका निवडणुकांत भाजपला लक्षणीय यश मिळाल्याचे नमूद करताना विखे पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या सामाजिक योजनांमुळे जनता भाजप व महायुतीच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत निवडणुकांत यापेक्षा अधिक भक्कम कामगिरी करून भाजपचा विजय निश्चित केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“बॉम्बस्फोटातील आरोपीविरोधात भूमिका मांडल्यानंतर दावे–प्रतिदावे झाले. मात्र त्याच्या अंत्यविधीसाठी एवढी गर्दी कशी जमते, आजही शहरात त्याचे फलक झळकतात आणि कार्यकर्ते शांत का राहतात, याची खंत वाटते,” असे विखे पाटील यांनी सांगितले.*

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!