राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता येथील शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कनिष्ठ व वरिष्ठ विभाग, औद्योगिक प्रशिक्षण संस्था व डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमांचा सांगता सोहळा निमित्त “माझी माती, माझा देश” तसेच “हर घर तिरंगा, घरघर तिरंगा” या अभियानांतर्गत राहाता शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.अशी माहिती प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वज हातात घेऊन “भारत माता की जय, वंदे मातरम” अशा दिलेल्या देशभक्तीच्या घोषणामुळे परिसर निना॑दून केला.डॉ. बाळासाहेब विखे पाटील इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सुंदर अशा झांज पथकाचे प्रात्यक्षिक नागरिकांना दाखवून मंत्रमुग्ध केले. तसेच छोट्या छोट्या चिमुकल्यांनी विविध वेशभूषा करून देशभक्तीच्या भावना जागवल्या.
राहाता शहरांमधील श्री वीरभद्र मंदिराच्या प्रांगणा मधून या रॅलीला सुरुवात झाली मोठ्या उत्साहाने महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, एनसीसी मधील कॅन्डेड, इंटरनॅशनल स्कूल मधील ,चिमुकली मोठ्या संख्येने या रॅलीमध्ये सहभागी झाले तसेच राहाता शहरातील नागरिकही या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. रॅली वीरभद्र मंदिर– खंडोबा मंदिर– शनी मंदिर— चितळी रोड– छत्रपती संकुल– चितळी चौक मार्गे पुन्हा वीरभद्र मंदिर अशी होती. रॅली संपल्यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ घोलप यांनी रॅली आयोजनाचा हेतू स्पष्ट करून उपस्थितांचे स्वागत केले. याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना अँड.रघुनाथराव बोठे पा. म्हणाले युवकांमध्ये देशभक्तीची जाणीव निर्माण होण्यासाठी आशा रॅलीचे आवश्यकता आहे अशा रॅलीमुळे राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागते. याप्रसंगी डॉ बापूसाहेब. पानगव्हाणे, माझी नगराध्यक्ष राजेंद्र वाबळे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी स्वाधीन गाडेकर, साहेबराव निधाने, दीपक दंडवते, सागर सदाफळ, सतीश बावके , मिलिंद बनकर,, सुरेश गाडेकर, राजूभाऊ पठाण संजय वाघमारे ,संदीप वाघमारे,संदीप वाबळे, डायरेक्टर डॉ.महेश खर्डे , प्राचार्य डॉ सोमनाथ घोलप, प्राचार्य सुनील दंडवते प्राचार्य किशोर निर्मळ उपप्राचार्य डॉ. दादासाहेब डांगे, उपप्राचार्य प्रा. संजय लहारे, डॉ सुरेश पुलाटे, डॉ संजय कदम,डॉ. दिलीप नलगे, डॉ सत्यजित पोतदार, डॉ राजाराम वाघचौरे डॉ.रोहिणी कासार, डॉ.वर्षा पाटील,डॉ.गोपीनाथ शिरोळे प्रा.आदिनाथ तांबे, प्रा चंद्रकांत बनसोडे, डॉ.विक्रम भालेकर, डॉ विष्णू पावडे, डॉ.दत्तात्रेय सातपुते, डॉ.सत्यजित पोतदार, डॉ ऐनूर इनामदार, डॉ. जयश्री दिघे प्रा.शुभांगी जगताप , प्रा.प्रियंका प्रियंका पेंडभाजे, प्रा रूपाली देसाई, डॉ टि.के.कुमकर, प्रा प्रणाली बोठे प्रा. प्रवीण कोळगे यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेतर सेवक विद्यार्थी विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.




