श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ):- रोटरी क्लब, श्रीरामपूर व डॉ.घोगरे डेंटल क्लिनीक तसेच श्रीरामपूर गुजराथी समाज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डिवाईन चॅरीटेबल ट्रस्ट, राजकोट यांच्या सहकार्याने मोफत दंत चिकित्सा शिबीर आयोजन शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी करण्यात आले असल्याची माहिती आयोजकानी दिली आहे.
रोटरी क्लब, श्रीरामपूर व डॉ.घोगरे डेंटल क्लिनीक तसेच श्रीरामपूर गुजराथी समाज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने डिवाईन चॅरीटेबल ट्रस्ट , राजकोट यांच्या सहकार्याने मोफत दंत चिकित्सा शिबीर आयोजन शुक्रवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी गुजराथी मंगल कार्यालय, वॉर्ड नं.७, थत्ते ग्राऊंड, श्रीरामपूर येथे शिबीराचे आयोजन सकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यत करण्यात आले आहे. या शिबीराचे भारतातील सुप्रसिध्द दंत वैद्य डॉ.जयसुख मकवाणा तसेच सहयोगी स्टाफ डॉ.संजय अग्रवाल ,डॉ.मोनीका भट्ट आणि डॉ.जागृती चौव्हाण यांच्या सहकार्याने आयुर्वेदच्या जालंधर बंध योग विद्या द्वारा विना इंजेक्शन, विना औषध, विना भुल, कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, हलत असलेले, दुखत असलेले दात व दाढ अल्हाद काढले जाईल. दातांच्या प्रत्येक रोगावर नि:शुल्क उपचार व सल्ला. कवळी (बत्तीसी) मध्ये तयार करुन मिळेल. त्यासाठी गरजुंनी आपले नाव रोटरी क्लबच्या सदस्यांकडे नोंदणी करणे आवश्यक आहे.शिबीरासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष भाग्येश कोठावळे, सेक्रटरी रवी निकम,खजिनदार विनोद पाटणी,उद्धव तांबोळी,
विशाल कोटक यांच्याशी संपर्क साधावा. शिबीराचा जास्तीजास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहान संयोजकानी केले आहे.



 
                                    
