श्रीरापूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):– ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक कार्यक्रमासाठी शहरात समाजमंदिर उभरण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आश्वासन आमदार लहू कानडे यांनी ख्रिश्चन समाजाच्या शिष्टमंडळास दिले.
श्रीरामपूर येथील ऑल पास्टर्स फेलोशिप व तालुयातील ख्रिस्ती समाजच्या शिष्टमंडळाने आमदार कानडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यावेळी आ. कानडे यांनी हे आश्वासन दिले. निवेदनात म्हटले आहे की, ख्रिश्चन समाजाच्यावतीने श्रीरामपूर शहरात धार्मिक, संस्कृतिक, सामाजिक तसेच प्रार्थना सभा अशा विविध प्रकारचे कार्यक्रम नेहमी राबविण्यात येतात. परंतु आमच्या समाजासाठी हक्काची जागा व कोणत्याही प्रकारचा हॉल नसल्याकारणाने कार्यक्रम घेण्यासाठी नेहमी अडचणी येतात.
ख्रिश्चन सामाजासाठी समाजमंदिरासाठी आमदार निधीतून हक्काची जागा व समाजमंदिर (सभागृह) शहरात बांधून मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रेव्ह. फा. राजेश कर्डक, रेव्ह. पा. एलिशा अमोलिक, रेव्ह. अमरकुमार दिवे, रेव्ह. फिलीप शिरसाठ, रेव्ह. सतीश आल्हाट, रेव्ह. सुभाष खरात, रेव्ह. विजय खाजेकर, दीपक कदम, पा. अशोक त्रिभुवन, पा. प्रवीण गायकवाड, पा. दीपक शेळके, पा. सतीश गायकवाड, पा. विल्सन बोर्डे, पा. एल. बी. देठे, पा. जोना वैरागर आदींसह समाजबांधव उपस्थित होते.
………….



