श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा ):- श्रीरामपूर सर्व शेतकरी बांधवांना कळविण्यात येते की आज दिनांक २१/०८/२०२३ वार सोमवार रोजी झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारतीय राष्ट्र समिती पक्ष व कांदा उत्पादक शेतकरी यांनी केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवर ४०% शुल्क आकारण्याचा निर्णयाविरोधात केलेल्या आंदोलनमुळे सर्व उपस्थित कांदा उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना व भारत राष्ट्र समिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीरामपूर कांदा मार्केट बंदच्या मागणीचे निवेदन कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. सुधीर वेणूनाथ पा. नवले व बाजार समितीचे सचिव श्री. साहेबराव वाबळे यांना निवेदन देण्यात आले.या मागणी नुसार दिनांक २२/०८/२०२३ वार मंगळवार पासून कांदा गोणी मार्केट व कांदा लूज मार्केट बेमुदत बंद ठेवण्यात येणार असल्याचे कालच जाहीर केले होते व तश्या विषयाची पोस्ट देखील कृषिउत्पन्न बाजार समितीच्या ग्रुप वर सोडण्यात आली व शेतकऱ्यांना विनंती करण्यात आली की, पुढील आदेश येई पर्यंत कोणीही आपला कांदा श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्रीरामपूर व टाकळीभान कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी आणू नये.
*कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये चार संचालक असलेले मुरकुटे गट (बी आर एस) व दुसरीकडे ससाणे गट सात संचालक व सभापती असलेला गट तहसील कार्यालयाला निवेदन देऊन भाजप सरकारच्या कांदा निर्यात धोरणाचा निषेध नोंदविता व शेतकरी हितासाठी केंद्र सरकारी कांदा* *निर्यात शुल्क विरोधात बाजार समिती वर* *आंदोलन करतात व सभापती ,व्यापारी ही आंदोलनाला पाठिंबा देऊन* *मार्केट बेमुदत बंद ठेवतात. पण परत २४ तासात घुमजावं करून मार्केट चालू करण्याचा निर्णय ही घेतात आज*
*यामुळे मात्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चलबिचल होत आहे*
परंतु आज पुन्हा शेतकरी व व्यापारी व मार्केट कमिटी श्रीरामपूर यांच्याच ग्रुप वर नवी पोस्ट करण्यात आली आहे की सर्व शेतकरी, व्यापारी ,हमाल,मापाडी यांना कळविण्यात येते की कृषी उत्पन्न बाजार समितीचे (श्रीरामपूर) मोकळा व गॊणी कांदा मार्केट उद्या दी.23 ऑगस्ट 2023 पासून पूर्ववत सुरु राहील आशी पोस्ट करण्यात आली व ही पोस्ट सध्या व्हायरल ही होत आहे.
काल मार्केट कमिटी सभापती सुधीर नवले व व्यापारी संचालक जितेंद्र गदीया कृषी उत्पन्न बाजार समिती श्रीरामपूर , भारतीय राष्ट्र समिती पक्ष (BRS) व शेतकरी संघटनेच्या वतीने केंद्र सरकारच्या कांदा निर्यातीवर
40% टक्के शुल्क अकरण्याच्या निर्णया विरोधात केलेल्या आंदोलना वेळी सांगितले की मार्केट कमिटी सर्व संचालक मंडळ व व्यापारी सर्व शेताकऱ्यांचा पाठीशी आहे जो पर्यंत सरकार लावलेले निर्यात शुल्क मागे घेत नाही तो पर्यंत कांदा मार्केट बेमुदत बंद राहील पण आज अचानक सभापती , सचिव यांच्याकडून मार्केट उद्या पासून सुरु राहील असे सांगण्यात आले आहे.
मार्केट कमिटी सभापती नवले *व्यापारी संचालक गदीया* *व मार्केट कमिटी संचालक मंडळ हे सरकार सारखीच सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांचि दिशाभूल करत आहे एकीकडे सांगायचे की आम्ही शेतकऱ्याच्या संपात* *सहभागी आहोत आणी दुसरीकडे कांदा मार्केट पूर्ववत सुरु करायचं यात मात्र पिळवणूक शेतकऱ्यांचीच
भारतीय राष्ट्र समिती पक्ष (बी आर एस) मुरकुटे गट यांच्या नेतृत्वात काल सरकारी कांदा निर्यात धोरणविरोधात व निर्यात शुल्क मागे घ्यावे यासाठी मार्केट कमिटीला निवेदन देण्यात आले व काही नेत्यांनी आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताच सरकार निर्णय घेत नाही तो पर्यंत आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीर उभे आहोत असे सांगितले व शेतकऱ्यांना एकीचे मंत्र दिले पण उद्या पासून मार्केट पूर्ववत सुरु होणार आहे व ह्याच मार्केट कमिटी मध्ये मुुरकुटे गटाचे चार संचालक आहेत मंग मुरकुटे गट पण शेतकऱ्यांच्या जखमावर कांदा मार्केट सुरु करून एक प्रकारे मीठ चोळत आहेत
सर्व शेतकरी,व्यापारी, हमाल – मापाडी यांना कळविण्यात येते की, श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मोकळा व गोणी कांदा मार्केट उद्या दि.२३ ऑगस्ट २०२३ पासून पूर्ववत सुरू राहील याची सर्वांनी नोंद घ्यावी ही विनंती
—- श्री सुधीर नवले (सभापती) श्री साहेबराव वाबळे( सचिव)