लोणी दि.२३ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्माभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे प्रवरा ग्रामीण औषधनिर्माणशास्ञ महाविद्यालयात जि -पॅट या विषयावर एक दिवसीय मार्गदर्शन परिसंवाद संपन्न झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भवर यांनी दिली.
महाविद्यालय प्रामुख्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी अशा प्रकारच्या परिसवांदचे आयोजन करत असते. या एकदिवसीय परिसवांदासाठी अकादमी ऑफ नायपर अस्पि्रांट्स चे संचालक डॉ. मच्छीद्र बोचरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते . डॉ.बोचरे यांनी तृतीय व चतुर्थ वर्ष पदवीच्या विद्यार्थ्यांना जि -पॅट साठी कशी तयारी करावी, कुठले संदर्भ पुस्तके,अभ्यासक्र आणि अभ्यासांची पध्दत,महत्वाच्या बाबींचा वापर आदींचे मार्गदर्शन केले. डॉ. इनामदार यांनी जि -पॅट व नायपर तयारी साठी स्वतःची काही पुस्तके प्रकाशित केलेली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा नक्कीच महाविद्यातील विद्यार्थ्यांना होणार आहे.
महाविद्यालयात स्वतंत्र ट्रैनिंग व प्लेसमेंट विभाग कार्यरत असून या विभागंतर्गत या परिसवांदचे आयोजन करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील मुलांना शिक्षणाबरोबर नोकरीं व व्यवसायात उपयुक्त गोष्टींवरती विविध उपक्रम महाविद्यालयात होत असतात एक दिवसीय परिसवानंदामध्ये मध्ये एकूण १०६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी ट्रैनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ . सोमेश्वर मनकर आणि प्रा. मंजुषा म्हस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.