3.1 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

नगर, नाशिक राष्ट्रवादीची जबाबदारी आ. प्राजक्त तनपुरे यांच्यावर जबाबदारी 

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ) : –राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर व नाशिक जिल्ह्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर सोपवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या सूचनेवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदारांची विविध जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यात माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे महत्वाच्या म्हणजे नगर व नाशिक या दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. आ. तनपुरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून ६ महत्वाच्या खात्याचा कारभार अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला होता. म्हणून शरद पवार यांनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे. २०१९ला नगर आणि नाशिक जिल्ह्यांत मिळून जवळपास १२ आमदार राष्ट्रवादीचे आहेत. यात नगर जिल्ह्यातील सहापैकी चार आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार गटाकडे गेल्याने तर नाशिकमध्येही हीच परस्थिती असल्याने आ. तनपुरे यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

यापूर्वी राज्यमंत्री असताना प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. तसेच ते चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत. आमदार तनपुरे हे राष्ट्रवादी शरद पवार गटातील विश्वासू, अभ्यासू व चांगले वक्ते असून ते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. अजित पवार गटात गेलेल्या आमदारांच्या मतदारसंघात पुन्हा राजकीय चढाई करून हे गड २०२४ला शरद पवारांच्या अधिपत्याखाली जिंकण्याची मोठी जबाबदारी आमदार तनपुरे यांच्यावर असणार आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!