5.8 C
New York
Friday, November 22, 2024

Buy now

spot_img
spot_img

गावातले तंटे गावातच मिटवा व ज्यांना समजत नसेल त्याना पोलीसी भाषेत समजवू — डाँ. बसावराज शिवपूजे

टाकळीभान( जनता आवाज वृत्तसेवा ):- गावातील तंटे गावातच मिटवा व ज्या लोकांना समजदारीची भाषा समजत नसेल त्यांना पोलीसी भाषेत समजवू. असे सज्जड इशारा नुकतीच टाकळीभान येथील शांतता कमिटीच्या बैठकीत श्रीरामपुर विभागीय पोलीस अधिकारी डाँ.बसावराज शिवपूजे यांनी दिला आहे.

श्रीरामपुर तालुक्यातील सर्वात मोठे असलेले गाव व हायवेवर असल्यामुळे या गावाला दहा ते बारा गावे जोडली गेलेली आहे. या गावात श्रीरामपुर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार असल्याने कांदा व भुसार माल विक्री साठी मोठी वर्दळ व आर्थिक व्यवहार सुद्धा मोठ्या प्रमानात होत असते. त्यामुळे या गावाला मोठी बाजार पेठ तयार होत आहे. त्या अनुषंगाने गावात येजा करणाऱ्या लोकांची मोठी वर्दळ असते .

डाँ शिवपूजे साहेब पुढे म्हणाले कि यापुढे गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कठोरात कठोर कार्यवाही करुन शासन करण्यात येईल.श्रीरामपुर तालुक्यातील १८  तडीपारीचे प्रस्ताव जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे पाठवले आहेत तर आणखी काही गुन्हेगार असे आढळल्यास  नव्याने प्रस्ताव तयार करुन पाठवू व आदेश येताच तात्काळ कार्यवाही करु असे प्रतीपादन केले व पुढील येत्या सण ऊत्सव हे खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडावे जेणे  करुन कुठल्याही धार्मिक कार्यक्रमात बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी.

यावेळी नानासाहेब पवार यांनी आपल्या भाषणात सागिंतले कि शक्यतो आम्ही गावातील वाद याच ठिकाणी एकञ येवून मिटवतो परंतु काही ठराविक लोक मुद्दाम हून वाद घडवून आणतात  अश्या वारवांर वाद घालनार्या लोकांवर तडीपारी सारखे गुन्हे दाखल करुन कठोर कार्यवाही करावी. तर जयकर मगर यांनी या गावात शाळा काँलेज असून श्रीरामपुर काँलेज साठी जाणाऱ्या मुलीची संख्या जास्त असल्याने मुलींना छेडछाड करणे व ञास देणारे टारगट मुले बस स्टँडवर व शाळेच्या गेटबाहेर असणाऱ्या मुलाचा बंदोबस्त करावा अशी महत्त्वाची सुचना मांडली कारण फुस लावून मुली पळवणे  व छेडछाडीचे प्रमाण वाढत असल्याने यावर लक्ष घालावेअशी विनंती केली . तर राजेद्र कोकणे, नारायण काळे, देशमुख काका यांची भाषणे झाली.

यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, शिवसेनेचे जेष्ठ नेते राधाकिसण वाघुले, डाँ श्रीकांत भालेराव,आबासाहेब रणनवरे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, उपसरपंच कान्होबा खंडागळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाबासाहेब बनकर , शिवाजी धुमाळ, भाजपाच्या महीला सुप्रीया धुमाळ, राहुल पटारे , दादासाहेब कापसे, सोमनाथ पाबळे,भैया पठाण,सुधिर मगर, विनोद रणनवरे,अमोल पटारे, प्रकाश धुमाळ, विजय थोरात, आतुल गवांदे, मधुकर गायकवाड ,सुनिल बोडखे, शिवा साठे,आप्पा रणनवरे , पोलिस निरीक्षक चौधरी साहेब, सहाय्यक उपनिरीक्षक आतुल बोरसे, अनिल शेगाळे व पोलीस ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!