7.3 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

धनुष्यबाण चिन्हावर आगामी सर्व निवडणुका लढवणार – खा.सदाशिव लोखंडे 

राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा): – शिवसेना पक्षाचे जिल्हा निरीक्षक प्रशांत काळे हे राहुरी दौऱ्यावर आले होते. व्यंकटेश लॉन्स येथे शिवसेना राहुरी ताल्युक्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक शिर्डी लोकसभेचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.

या प्रसंगी दत्तात्रय दळवी,संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार,द.जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले,उपजिल्हाप्रमुख अण्णासाहेब म्हसे, जयवंत पवार,अनंतराव शेळके,शशिकांत दिवटे,राहुरी तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे,ता.संघटक महेंद्र उगले,ता.संपर्कप्रमुख अशोक तनपुरे, अध्यात्मिक आघाडी जि.प्र.संपत जाधव,ता.उपप्रमुख प्रशांत खाळेकर,शेतकरी आघाडी ता.प्र.किशोर मोरे,शहर प्र.गंगाधर सांगले हे मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी यांना मार्गदर्शन करतांना निरीक्षक प्रशांत काळे म्हणाले कि,शिवसेना पक्ष प्रमुख तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने राहुरी तालुक्याचा कामकाजाचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष बैठक घेत आहोत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून घेतलेले निर्णय व त्या निर्णयांची शासकीय स्तरावर झालेली अमलबजावणी याची माहिती घेतली जात आहे.तसेच शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने सर्वत्र बैठका घेतल्या जात आहेत असे श्री.काळे यांनी सांगितले.

या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात खा.सदाशिव लोखंडे म्हणाले कि,आगामी येणाऱ्या सर्व निवडणुका पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने धनुष्यबाण या चिन्हावर लढवल्या जाणार आहेत.राहुरी तालुक्यात ता.प्रमुख देवेंद्र लांबे यांच्या कामामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पहावयास मिळत आहे.शिवसैनिकांनी आगामी निवडणुकांसाठी तयारीला लागावे असे श्री.लोखंडे म्हणाले.

या कार्यक्रमास ३२ गाव उपप्रमुख प्रभाकर तुपे,युवा सेना प्र.औदुंबर करपे,बाळासाहेब जाधव, ता.कायदेशीर प्रमुख ॲड.चंद्रशेखर शेळके,महिला आघाडी ता.प्र.वनिताताई जाधव,महिला आघाडी राहुरी शहर प्रमुख साळे श्रावणी,दे.प्र.शहर मा.प्र. वसंत कदम,बाळासाहेब कदम,बाप्पुसाहेब काळे,३२ गाव शिवदूत प्रमुख दादासाहेब खाडे,उप ता.प्रमुख अनिल आढाव,ज्ञानेश्वर सप्रे,सुनिल खपके,विधानसभा प्र.अरुण जाधव,विभाग प्र.विजय आढाव,ता,सहसंघटक ज्ञानेश्वर धसाळ,मिलिंद हरिश्चंद्रे,जाधव भानुदास,गोरक्षनाथ सिन्नरकर,सरोदे संतोष,अजित ससाणे,अशोक शेळके,आशुतोष शिंदे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन रोहित नालकर व महेंद्र शेळके यांनी केले तर सूत्रसंचालन महेंद्र उगले यांनी केले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!