राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी नगरपरिषद अंतर्गत सुरू होणाऱ्या भुयारी गटार योजनेच्या पहिल्या टप्प्याचे भूमिपूजन समारंभ राज्याचे महसूल व दुग्धविकास मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते व जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक २७ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती राहूरी नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते व विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी दिली आहे.
याबाबत पत्रकार परिषदेमध्ये बोलताना रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सांगितले राहुरी नगरपरिषद राहुरी च्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभिमान राज्यस्तरांतर्गत राहुरी शहरी गटार योजनेला १३४ कोटी ९८ लक्ष रुपयांचा पहिला टप्पा मंजूर झाला असून त्यापैकी ९२ कोटी ९८ लाख रुपये मंजूर झाले आहेत. या कामाचा शुभारंभ २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता राही येथील नवी पेठ येथे राज्याचे महसूल व पशुसंवर्धन मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील, शिर्डी संस्थानचे माजी उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर कदम, जिल्हा केले आहे. परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी चेअरमन व ज्येष्ठ नेते अॅड. सुभाष पाटील, कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ढोकणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर योजना मंजूर करण्यासाठी तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून या योजनेसाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले व खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या मदतीने १३४ कोटी ९८ लाख रुपये निधी मंजूर करून आणलेला आहे या साठी त्यांनी अनेक दिवस कष्ट घेऊन विविध कागदपत्रांची पूर्तता केली त्याचबरोबर अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या कडे नामदार विखे यांच्या माध्यमातून जाऊन हा निधी मंजूर करून घेतलेला आहे. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी राहुरी तालुका विकास मंडळाचे सर्व कार्यकर्ते शहरातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तनपुरे यांनी
या पत्रकार परिषदेस आर आर तनपुरे, प्रकाश पारख, डॉक्टर धनंजय मेहेत्रे, राजेंद्र उंडे, कैलास माळी, दिपक मेहेत्रे, राजेंद्र म्हसे, सुभाष वराळे, प्रदीप भुजाडी, ज्ञानेश्वर पोपळघट, देवेंद्र लांबे, दादासाहेब तोडमल, अशोक वामन, आबासाहेब येवले, सुरेश भुजाडी, शिवाजीराव डौले, मधुकर पोपळघट, रंगनाथ तनपुरे, सचिन म्हसे, अजित डावखर, भाऊसाहेब काकडे, अक्षय तनपुरे, सुजय काळे, कांतीराम वराळे, गोपाळ अग्रवाल, चांगदेव भोंगळ, राजेंद्र वराळे, यांच्यासह भाजपाचे व विकास मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..