लोणी दि.२५ ( जनता आवाज वृत्तसेवा):लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिर शाळेत विविध शाळाबाहय स्पर्धांचे आयोजन केले जाते. अशाच मंथन प्रज्ञाशोध राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत शाळेतील इ.१ली ते इ. ४ थी चे २२८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी ३५ विदयार्थ्यांनी गुणवत्ता यादीत उज्ज्वल यश मिळवले आहे.अशी माहीती प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सिमा बढे यांनी दिली.
मुलींच्या शिक्षणात आघाडीवर असलेल्या या शाळेतील इयत्ता पहिलीतील ओंजल डेगळे केंद्रात २ री, जिल्ह्यात ११ वी आणि राज्यात १५ वीं, ऋचा निर्मळ केंद्रात ३री, जिल्ह्यात १५ वी, राज्यात १९ वी, अक्षय निकम केंद्रात चौथा, जिल्ह्यात १८ वी राज्यात १९ वा, इयत्ता दुसरीतील अन्वी नवनाथ विखे केंद्रात तिसरी, जिल्ह्यात २१ वी, राज्यात २२ वी, इयत्ता तिसरीतील अन्वी बोराडे केंद्रात पहिली, जिल्ह्यात १० वी, राज्यात १२ वी, आराध्या भोसले केंद्रात तिसरी, जिल्ह्यात २६ वी, राज्यात २८ वी, इयत्ता चौथीतील प्राग्वंश निर्मळ केंद्रात दुसरी, जिल्ह्यात २४ वा,जिल्हात २४ वा, राज्यात २१ वा आला आहे.
यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल ना. राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालीनीताई विखे पाटील, खा.डाॅ.सुजय विखे पाटील,डाॅ.सुश्मिता विखे पाटील सचिव भारत घोगरे,अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी डाॅ.शिवानंद हिरेमठ, संस्थेच्या शिक्षण संचालिका सौ. लिलावती सरोदे लिलावती,समन्वयक प्रा.एन.डी. दळे, प्रवरा कन्या विद्या मंदिर प्राचार्या सौ. भारती कुमकर,प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ.सिमा बढे यांनी अभिनंदन केले आहे.