नेवासा फाटा ( जनता आवाज वृत्तसेवा):-” चंद्रयान-२ मोहीम अपयशी ठरली. त्या अपयशातून शास्त्रज्ञांनी धडा घेतला. चुका शोधल्या, त्या दुरुस्त केल्या आणि नव्या उमेदीने नव्या मोहिमेची रचना केली. चंद्रयान -३ चे यश म्हणजे आधीचे अपयश पाठीवर टाकून गेल्या चार वर्षांत इस्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या परिश्रमाला लगडलेली ऐतिहासिक गोड फळे असल्याचे प्रतिपादन नेवास येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गोरक्षनाथ कल्हापुरे यांनी केले.
नेवासे येथील मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात इस्रोच्या चंद्रयान-३ यशस्वी मोहिमेबद्दल शास्त्रज्ञांचे आभार व अभिनंदन करण्यासाठी घेण्यात आलेल्या सभेत प्राचार्य डॉ. कल्हापुरे बोलत होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. अरुण घनवट, उपप्राचार्य प्रा. दशरथ आयनर पर्यवेक्षिका प्रा. राधा मोटे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. सुनील गर्जे, प्रा. अमोल जाधव व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. कल्हापुरे म्हणाले, ” यशस्वी झालेल्या चंद्रयान-३ या मोहिमेतून विद्यार्थ्यांनी अपयशानंतर नाउमेद न होता. जिद्द, चिकाटी व ध्येय गाठण्यासाठी घ्यावे लागणारे परिश्रम यातून अपयशवर यशाने कशी मात करता येते याची प्रेरणा घ्यावी. व जीवनात यशस्वी व्हावे.
यावेळी प्राचार्य कल्हापुरे यांनी चंद्रयान-३ मधील प्रमुख पाच शास्त्रज्ञांची वैयक्तिक माहिती देत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून व घोषणा देत जल्लोष केला.
प्रास्ताविक उपप्राचार्य आयनर यांनी केले. यावेळी प्रा. प्रकाश वाळुंज, प्रा. डॉ. बाळासाहेब जगताप, प्रा. नवनाथ आगळे, डॉ. वसंत सपकाळ, प्रा. एन. डी. शेख, प्रा. अजय पाटील, प्रा. दिगंबर सोनवणे, डॉ. मच्छिन्द्र वर्पे, शिक्षक नेते गोवर्धन रोडे, प्रा. भगवंत विरकर, प्रा. संदीप तोगे, प्रा. कविता जाधव, प्रा. ज्योती भोगे, प्रा. सरस्वती देव्हारे, प्रा. सुकन्या आगळे, प्रा. मयूर जामदार, प्रा. सुभाष सोनवणे, प्रा. रामभाऊ पवार, प्रा. सुजय नवले, प्रा. हरिश्चंद्र पंडित, प्रा. रवींद्र घोलप, प्रा. सूर्यकांत बर्डे, प्रा. सुरेश होले, प्रा. मुकुंद खर्डे, किरण शेटे, भाऊसाहेब चक्रनारायण, समीर शेख यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आभार प्रा. देविदास साळुंके यांना मानले तर सूत्रसंचालन प्रा. अमोल जाधव यांनी केले.
शाळा- महाविद्यालयात जल्लोष.!दरम्यान, चंद्रयान ३ च्या यशस्वी मोहिमेनंतर आज गुरुवार दि. २४ रोजी नेवासे तालुक्यातील बहुतांशी शाळा-महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी जल्लोष करत प्रभात फेरी, आभार व अभिनंदन सभा घेऊन या मोहीमेतील शास्त्रज्ञांबाबत कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी “भारत माता की जय”, “भारताची शान चंद्रयान..!” यासह विविध देशभक्तीपर दिलेल्या घोषणांनी शाळा- महाविद्यालयांसह परिसर दणाणून गेला होता



