लोणी दि.२७ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या साञळ येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे सोमवार २८ आॅगस्ट ते २ सप्टेंबर २०२३ या कालावधीत अंतिम वर्षात शिकत असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ट्रेनिंग प्लेसमेंट सेलच्या वतीने सहा दिवसीय सॉफ्ट स्किल ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी दिली.
महाविद्यालयामध्ये संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामुख्याने विद्यार्थी केंद्रित उपक्रम आयोजित केले जातात. त्यापैकी ट्रेनिंग प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांसाठी विविध ट्रेनिंग आयोजित करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जातो. दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात चढाओढ चालू झाली आहे , नोकरी व्यवसाय सर्वच क्षेत्रात आव्हाने उभी ठाकली आहे अशा परिस्थितीत आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी हा कोणत्याही परिस्थितीत मागे राहता कामा नये यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्न करत असते त्यासाठीच ग्लोबल टॅलेंट ट्रॅक ,पुणे यांचे वतीने महाविद्यालयात सहा दिवसीय ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे. सदर ट्रेनिंग मध्ये विद्यार्थ्यांना नोकरीसाठी आणि व्यवसायासाठी लागणारे प्रशिक्षण मिळणार आहे. या ट्रेनिंग द्वारे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल, तसेच विविध कौशल्य आत्मसात होतील. तसेच भविष्यात त्यांनी निवडलेल्या कार्यक्षेत्रात त्यांना यशस्वीपणे वाटचाल करता यावी साठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य डॉ. प्रभाकर डोंगरे यांनी केले आहे.



