spot_img
spot_img

हरेगाव येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ राहाता  पोलीस RPI च्या राहाता पोलीस स्टेशन ला निवेदन

राहाता (जनता आवाज वृत्तसेवा ):- हरेगांव येथे तरुणांना झालेल्या अमानुष मारहणीच्या घटनेविरुद्ध निषेध व्यक्त करून आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांचेविरुध्द कठोर कारवाई करन्या बाबत . राहाता पोलीस स्टेशनचे निरीक्षक यांना रिपाई वतीने निवेदन देण्यात आले आहे या

निवेदन देण्यात येते की, श्रीरामपूर तालुक्यातील हरेगांव येथे क्षुल्लक कारणावरून चार तरुणांना झाडाला उलटे टांगून, विवस्त्र करून अमानुषपण केलेल्या मारहाणीच्या घटनेची राहाता तालुका रिपाई पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला आहे.

या घटनेतील मुख्य आरोपी युवराज गलांडे व त्याचे इतर साथीदार यांनी जुन्या किरकोळ कारणावरून चारही मुलांना केलेल्या अमानुष कृत्याबद्दल त्यांचेवर गुन्हा दाखल करण्यात येवून जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून अशा प्रकारचे अमानुष कृत्य करण्यास कोणाचीही हिम्मत होणार नाही. सदरील आरोपी यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी असुन या आरोपींना जर मोकळे सोडले तर त्यांची भिती नष्ट होवून ते प्रकारचे गुन्हे समाजात करु शकतात.

त्यामुळे सदर आरोपींना तात्काळ अटक करुन त्यांचेवर कठोर कारवाई करून मारहाण झालेल्या दलित समाजातील अल्पवयीन मुलांना न्याय मिळावा अशी मागणी निवेनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी प्रदिप बनसोडे जिल्हा अध्यक्ष रिपाई,ता.अध्यक्ष धनंजय निकाळे,गणेश निकाळे संतोष निकाळे, संतोष बनसोडे आतिश लोखंडे, शिंदे दिलीप निकाळे,रावा निकाळे,जितु दिवे युवा ता.अध्यक्ष दिपक शिंदे.सुनिल लोखंडे . गणेश बनसोडे.ओम निकाळे.बाळासाहे खाडे.आतुल बनसोडे.बाबासाहेब बनसोडे.मुसा शेख.किशोर दंडवते.आक्षय साळवे.दिलिप वाघमारे.दिलीप साळवे.आमोल भोसले.नितिन वाघमारे. झुंबर शिंदे.आदी उपस्थित होते

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!