spot_img
spot_img

रेवणनाथ चोभे, अमोल भनगडे भाजपच्या व्यवस्थापन समितीत

राहुरी,( जनता आवाज वृत्तसेवा ) :– भारतीय जनता पक्षातर्फे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने राहुरी मतदारसंघ व्यवस्थापन समितीच्या निवडी जाहीर करून कार्यकत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रेवणनाथ चोभे यांची विधानसभा प्रभारीपदी, तर माजी तालुकाध्यक्ष अमोल भनगडे यांची संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली विधानसभा व्यवस्थापन निवडण्यात आली. नगर येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या -अध्यक्षतेखाली पार पडली. ती या निवडी झाल्या.

रेवणनाथ चोभे निवडलेल्यांची नावे सोशल मीडिया : सुजय काळे, श्रीकांत आटकर, महेश कर्डिले. मीडिया टीम : विलास मुखेकर, राजेंद्र वाडेकर, शशिकांत पवार, कायदा विधी : अँड . गणेश पाखरे, कैलास पटारे, अँड . महेश शेडाळे, केंद्र योजना : अंजली येवले, महादेव पाठक, प्रचार साहित्य : प्रभाकर हरिश्चंद्रे, सरल ॲप : नारायण समिती धोंगडे, वॉर रूम : सागर बनकर, अनु. जाती विभाग सुभाष गायकवाड, अनु. जमाती विभाग अविनाश बाचकर, ओबीसी विभाग : विजय कानडे, भटक्या-विमुक्त जाती-जमाती विभाग : बापूसाहेब आव्हाड.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!