spot_img
spot_img

कात्रड पुलवाडी व वांबोरी येथील मुलींना विद्यालयामध्ये जाण्यासाठी बस उपलब्ध, खा. तनपुरे यांच्या प्रयत्नाला यश 

राहुरी( जनता आवाज वृत्तसेवा ) :-  राहुरी  तालुक्यातील कात्रड व पूलवाडी येथील मुलींना वांबोरी येथे शाळा व महाविद्यालयामध्ये जाण्यासाठी काल पासून एसटी बससेवा उपलब्ध झाली आहे. त्यासाठी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी विशेष प्रयत्न केले.

राहुरी तालुक्यातील कात्रड ते वांबोरी दरम्यानचे सुमारे सात किलोमीटर अंतर आहे. या परिसरातील ७० मुली रोज शिक्षणासाठी वांबोरी येथे जातात. त्यांना सायकलवरून किंवा खासगी वाहनातून प्रवास करावा लागत होता. माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी फक्त मुलींसाठी एसटी बस सुविधा सुरू करण्याची मागणी केली होती. त्यानुसार बस सुरू झाल्याने ह्या मुलींना आता अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत ७० मुलींना मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध झाली आहे..

मॅनेजर जयप्रकाश जाधव, वाहक पोपटराव गाढवे व चालक रावसाहेब रणशूर यांचा सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका धामणे, सरपंच बाबासाहेब शिंदे व उप सरपंच सदिप निकम यांनी केला. तर वांबोरी येथील शाळेत मुख्याध्यापक तागड, नगर डेपोची ही बस कात्रड येथून रोज सकाळी सव्वानऊ वाजता बस निघणार आहे.

सदर बस सुरु झाल्याबद्दल शाळेच्या वतीने व कात्रड ग्रामस्थांचे वतीने डेपो पूलवाडी मार्गे वांबोरी येथे महेश मुनोत करण्यात आले.

कन्या विद्यालयाच्या प्रांगणात बस थांबणार आहे. शाळा सुटल्यावर पुन्हा सायंकाळी चार वाजता वांबोरी येथे कन्या विद्यालयातून कात्रड येथे बस जाणार आहे. या बसचा सर्वात जास्त फायदा शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना होणार असून इतरही प्रवाशांना ह्या बसचा लाभ मिळणार आहे. यावेळी भागवतराव पागिरे, साहेबराव दांगट, भाऊसाहेब चौधरी, तबाजी सप्रे, बाळासाहेब पटारे, बाबासाहेब पागिरे, दत्तात्रय शेळके, आसाराम ससाणे, राजेंद्र घुगरकर, राजेंद्र निकम, अचलताई झंवर आदीसह ग्रामस्थ पालक शिक्षकवृंद उपस्थित होते. शाळेच्या वतीने सकाळी बसचे स्वागत करण्यात आले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!