spot_img
spot_img

“इंटरनेट ऑफ थिंग्स” वरील दोन दिवसीय कार्यशाळा छत्रपती अभियांत्रिकी मध्ये यशस्वीरित्या संपन्न:

नगर (जनता आवाज वृत्तसेवा ):-आज-काल आपण स्मार्ट वॉच, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट मोबाइल असे सारे शब्द ऐकत असतो, स्मार्टवॉच वरून आपण फोनसुद्धा कनेक्ट करतो, अलेक्सा सारखे डिव्हाइस आपल्याला फोन आलेल्या व्यक्तीचे नाव देखील व्हाईस कमांडद्वारे सांगतात, ही सगळी किमया आहे “इंटरनेट ऑफ थिंग्स” म्हणजेच आयओटी ची. थोडक्यात सांगायचं झालं तर इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) हे एक सोशल नेटवर्क किंवा ई-मेल सेवेसारखे आहे, परंतु लोकांना जोडण्याऐवजी आयओटी प्रत्यक्षात स्मार्ट डिव्हाइस कनेक्ट करते.

आयओटी विषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याची इच्छा जशी मोठ्या माणसांमध्ये आहे तसेच आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये देखील असणारच म्हणूनच श्री छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती येथे “ॲडव्हान्स इंटरनेट ऑफ थिंग्स” या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. महाविद्यालयामधील संगणक विभाग आणि आयआयटी वाराणसी यांच्या संयुक्त विद्यमानाने दोन दिवसांची ही कार्यशाळा दिनांक ७ आणि ८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती.

सदर कार्यशाळेत  इंटरनेट ऑफ थिंग्स बद्दल परिचय, सेन्सर्स बद्दल माहिती, क्लाऊड कम्प्युटिंग,  इत्यादी विषयांवरती अद्यावत अशी माहिती सविस्तर उपलब्ध करून दिली गेली. कार्यशाळेत इलेक्ट्रॉनिक किट्स आणि इलेक्ट्रॉनिक चिप्सचा वापर करून प्रात्यक्षिके घेण्यात आली. तसेच सर्व सहभागींना  महाविद्यालय व आयआयटी वाराणसी तर्फे सर्टिफिकेट देण्यात आले. तसेच या कार्यशाळेत नंतर एक स्पर्धा घेण्यात आली, त्यामधील पहिल्या दोन टीम यापुढील स्पर्धेसाठी आयआयटी वाराणसी येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी पात्र झालेल्या आहेत.

महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रम विद्यार्थ्यांसाठी राबवत असते जेणेकरून विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये जास्तीत जास्त नोकरीच्या संधी उपलब्ध होतील, या अनुषंगाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. आर. खर्डे यांनी केले.

विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरलेल्या अशा या कार्यशाळेसाठी आयआयटी वाराणसी मधील प्राध्यापक अन्वेश रेड्डी आणि शरद चंद्रा यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच या कार्यशाळेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून संशोधक गणेश येवले सर (व्ही. आर. डी. इ.) हे लाभले होते. सर्व पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने संगणक विभागप्रमुख प्राध्यापिका जगताप विद्या यांनी केले. दोन दिवसीय कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. कोहकडे पी. एस. यांनी केले तसेच आभार प्रदर्शन प्रा. घाडगे आर. ए. यांनी केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!