spot_img
spot_img

प्रवरा कृषी महाविद्यालयाच्या माध्यमातून तांभेरे येथे दुभत्या जनावरमधील चारा आणि रोग व्यवस्थापना विषयी चर्चासत्र 

लोणी दि.३०( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुसण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित, कृषी महाविद्यालय लोणी येथील अंतिम वर्षात शिकत असलेल्या कृषिदुताक-डून दुभत्या जनावरांमधील चारा आणि रोग व्यवस्थापन चर्चासत्राचे आयोजन तांभेरे ता. राहुरी येथे आयोजन केले होते.

या चर्चासत्रात महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे सहाय्यक प्रा. डॉ. रवींद्र निमसे यांनी चारा व्यवस्थापना वरील योग्य आणि सखोल माहिती शेतकऱ्यांना दिली. याप्रमाणे शेतकऱ्यांद्वारे विचारण्यात आलेल्या विविध प्रश्नांचे निराकरण करण्यात आले . तसेच पशुसंवर्धन पदविका प्राचार्य डॉ.दादासाहेब मोकाटे यांनी जनावरांचे विविध रोग व्यवस्थापनातील माहिती शेतकऱ्यांना दिली यामध्ये विशेषता लंपी आजारावरील लक्षणे आणि उपाययोजना योग्य पद्धतीने करण्याचे मार्गदर्शन केले, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. .नागरे यांनी शेतकऱ्यांना जनावरांमधील रोगाबाबत शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाबद्दल मार्गदर्शन करण्यात केले.

यावेळी तांभेरे गावातील सरपंच , माजी सैनिक , प्रतिष्ठित नागरिक , दूध उत्पादक आणि प्रगतशील शेतकरी इत्यादी उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी संस्थेच्या कृषी संचालिका डॉ.शुभांगी साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम समन्वयक प्रा.रमेश जाधव, कार्यक्रम अधिकारी डॉ.दिपाली तांबे आणि कृषीदूत नेताजी शिंदे , दिग्विजय ढमढेरे , सुशांत नांद्रे , हर्षद हांगे , आदेश पवार यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!