टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांची अशोक सहकारी साखर कारखान्याच्या कारेगावभाग संचालकपदी निवड करण्यात आली आहे.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचे समर्थक व टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांना नुकतेच कारेगावभाग संचालक पदी निवडीचे पत्र वितरित करण्यात आले आहे. श्री. शिंदे यांच्या निवडीबद्दल त्यांचे अशोक उद्योग समुहाचे सुत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे, युवा नेते सिद्धार्थ मुरकुटे, सौ. मंजूश्रीताई मुरकुटे, बी. आर. एस. चे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे, अशोकचे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, श्रीरामपूर लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिम्मतराव धुमाळ, अशोकचे व्हा. चेअरमन पुंजाहरी शिंदे, माजी व्हाईस चेअरमन दत्तात्रय नाईक, बाजार समितीचे संचालक मयुर पटारे, अशोकचे संचालक यशवंत रणनवरे, टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे उपाध्यक्ष रावसाहेब वाघुले, सरपंच अर्चनाताई रणनवरे, ग्रा.स. भाऊसाहेब पटारे, सुनील बोडखे, माजी उपसरपंच पाराजी पटारे, मल्हार रणवरे,अशोक उद्योग समुहाचे सर्व पदाधिकारी, टाकळीभान लोकसेवा विकास आघाडीचे सर्व सदस्य ग्रामपंचायत सदस्य आदिंनी अभिनंदन केले आहे.



