कोपरगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित “मोफत मदत सेवा केंद्रास” कोपरगाव तहसील कार्यालयाच्या निवासी नायब तहसीलदार प्रफुल्लीता सातपुते मॅडम यांनी गुरूवारी (दि.३१) सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत कोकमठाण महसुल मंडळाच्या मंडळ अधिकारी वैशाली रक्ताटे मॅडम उपस्थित होत्या.
यावेळी सातपुते मॅडम यांनी मोफत मदत सेवा केंद्रामार्फत चालणाऱ्या कार्याची माहिती घेतली व समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या हस्ताक्षरात अभिप्राय देखील नोंदवला. तसेच सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही दिले. यावेळी मदत केंद्रातील स्वयंसेवकांनी सातपुते मॅडम व रक्ताटे मॅडम यांचा मानाचा फेटा व श्रीफळ देऊन सन्मान केला.
यावेळी मोफत मदत सेवा केंद्राचे स्वयंसेवक तथा कामगार तलाठी प्रसाद कदम, लिपिक रामदास माळवदे, भाऊसाहेब टेके, माजी सरपंच बद्रीनाथ जाधव, गणेश भाटी, संकल्पक रोहित टेके, राजेंद्र ठाकूर, दिलीप काका गडकरी, अशोक निळे, राजेंद्र ठाकूर, स्वप्निल टेके, अभिजीत टेके, तपासे काका उपस्थित होते.



