टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील यादव कालीन पुरातन श्री. विठ्ठलरूख्मिणी मंदिरात ह. भ.प. कृष्णा महाराज वाघुले यांच्या अधीपत्याखाली पाऊस पडावा म्हणून त्रिदिनी अखंड नाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
यावर्षी पाऊस कमी असल्या कारणाने बळीराजा सुखी व्हावा म्हणून पांडुरंगाकडे पाऊस पडण्यासाठी साकडे घालण्यासाठी दिनांक ३१/८/२३ ते २/९/२३ या दरम्यान सकाळी ८ ते १० या वेळेत त्रिदिनी अखंड नामजप केला जाणार आहे. आज पासून श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदीरात तीन दिवस अखंड नामजप सुरू करण्यात आला आहे.
यावेळी ह.भ.प. कृष्णा महाराज वाघुले, ह. भ. प. गांगुर्डे महाराज, वासुदेव साबळे, लहानभाऊ पवार ,प्रकाश टाकळकर, कडूबाळ हिवाळे, भाऊ खंडागळे, चितळे, पटारे, सिताबाई गलांडे, मंदिराचे विश्वस्त नानासाहेब लेलकर, गंगाधर गायकवाड, लक्ष्मण भालसिंग आदी उपस्थित होते.



