लोणी दि.१ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-कृषी संदर्भात केवळ पदवी न घेता विद्यार्थ्यांनी कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयामध्ये असलेल्या सुविधांचा लाभ घेऊन कौशल्य वृद्धीसाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी सजगतेने सहभाग नोंदवावा, उत्तम आणि दर्जात्मक गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी लोकनेते बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या प्रवरा कृषी संलग्नित महाविद्यालयातील बीएस्सी ऍग्री, ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट, बायोटेक्नॉलॉजी आणि फूड टेक्नॉलॉजी चे सर्व सहकारी कटीबद्ध आहेत. असे प्रतिपादन संचालिका डॉ शुभांगी साळोखे यांनी केले.
लोणी येथील कृषी व कृषी संलग्नित महाविद्यालयांमध्ये बीएस्सी ऍग्री, ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट आणि एग्रीकल्चरल बायोटेक्नॉलॉजी करिता प्रवेशित झालेल्या नवोगतांचे मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी प्रथम वर्षात प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट चे प्राचार्य डॉ. किरण गोंटे, बायोटेक चे प्राचार्य डॉ विशाल केदारी, यांनीही विद्यार्थ्यांचे स्वागत केले.याप्रसंगी कृषी महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांनी देखील आपली मनोगते व्यक्त केली.
प्रवेशित विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष व महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, संस्थेचे विश्वस्त आणि माजी मंञी आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकरी अधिकारी डॉ.शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे यांनी शैक्षणिक कारकिर्दी करिता शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनिल बेंद्रे यांनी केले तर आभार प्रा. मनीषा अदिक यांनी मानले.



