spot_img
spot_img

विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पद्यश्री डाॅ.विखे पाटील जयंती साजरी

लोणी दि.१ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-पद्मश्री विखे पाटील कनिष्ठ महाविद्यालय, प्रवरानगर येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांची १२३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ कौसाबाई बाळासाहेब राऊत, प्रवरा माध्यमिक विद्यालय आडगाव स्कूल कमिटी व्यवस्थापन सदस्या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.पंडित वाघ सर यांनी केले. दीप प्रज्वलानंतर प्रा. सौ.शशीकला खेतमाळीस यांनी पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जीवनाविषयी सविस्तर माहिती दिली तर पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख प्रा. के. बी बारगुजे यांनी चंद्रयान 3 विषयी माहिती देऊन वेगवेगळ्या क्षेत्रात पद्मश्रींसारखे नेत्र दीपक यश संपादन करण्याविषयी विद्यार्थ्यांना प्रेरित केले.कु. येडे साक्षी पंजाब या इयत्ता अकरावी आर्ट्स च्या विद्यार्थिनी ने पद्मश्रींच्या गौरवशाली कारकिर्दी विषयी माहिती दिली.

प्राचार्य डॉ. आण्णासाहेब तांबे यांनी पद्मश्रीं चे जीवन कसे प्रेरणादायी आहे व कष्टशिवाय यश नाही हे विद्यार्थ्यांना पटवून दिले.

प्रा. सौ.शीतल भवार व प्रा. सौ.जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. सौ. लाल यांनी उपस्थितांचे आभार मानले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य सौ.सुजाता देवरे , भौतिक शास्त्र विभागाचे प्रा. गांगर्डे , गणित विभागा प्रमुख प्रा. बढे जीवशास्त्र विभाग प्रमुख प्रा. लहारे फार्मसी कॉलेजचे प्रा. बल्साने व सर्व प्राध्यापक – प्राध्यापकेतर तसेच विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!