spot_img
spot_img

पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयास १३.२५ लाख रुपयांचे प्रकल्प अनुदान मंजूर-डॉ. दिघे विद्यार्थ्याना मिळणार औषधी वनस्पतीची माहीती

लोणी दि.१ ( जनता आवाज वृत्तसेवा ):-लोकनेते पद्यभुषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या लोणी येथील पद्मश्री विखे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाला राष्ट्रीय औषधीय पादप बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून १३.२५ लाख रुपयांचा इस्टॅब्लिशमेंट ऑफ स्कूल हर्बल गार्डन हा प्रकल्प मंजूर झाला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे यांनी दिली. 

महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने वरील संस्थेला प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाचा सकारात्मक विचार करून; नवी दिल्ली यांच्याकडून हे अनुदान मंजूर झाले आहे. या प्रकल्पात २५ शाळांची निवड करण्यात आली असून; या प्रकल्पाचा हेतू विद्यार्थ्यांमध्ये औषधी वनस्पतींची माहिती, त्यांचा दैनंदिन जीवनातला उपयोग व शास्त्रीय पद्धतीने लागवड कशी करावी हा आहे. हा प्रकल्प महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. अनिल वाबळे, शिर्डी साई संस्थेचे डायरेक्टर डॉ. महेश खर्डे आणि डॉ. संजय गिरी यांनी सादर केलेल्या प्रकल्पाला मंजूर झाला आहे.

हा एक आगळावेगळा व नाविन्यपूर्ण प्रकल्प असून; या प्रकल्पाच्या माध्यमातून दुर्मिळ वनऔषधींचे जतन व संगोपन करण्याची नामी संधी महाविद्यालयाला प्राप्त झाली आहे. यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक आणि आयुष मंत्रालय भारत सरकारच्या विभागीय सुविधा केंद्राचे संचालक डॉ. दिगंबर मोकाट यांच्या अनमोल मार्गदर्शनातून प्राप्त झाले आहे. या औषधींचा उपयोग विविध विकारांच्या उपचारासाठी कसा करता येईल याची माहिती व सर्वसामान्य लोकांना आयुर्वेदाचे महत्त्व यातून निश्चित स्पष्ट करता येईल.

हा प्रकल्प मंजूर झाल्याबद्दल वनस्पतीशास्त्र विभागाचे महाविद्यालयातील सर्व सहकारी प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे. यासाठी उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब रणपिसे यांचेही मोलाचे योगदान मिळाले.

डॉ. महेश खर्डे व डॉ. अनिल वाबळे यांच्याशी संपर्क साधला असता हा एक आगळावेगळा व नाविन्यपूर्ण प्रकल्प असून; प्रवरा परिसरातील २५ शाळांमध्ये दुर्मिळ अशा वनऔषधींचे महत्त्व आजच्या पिढीला पटवून देण्यात येणार आहे व आपण पुन्हा एकदा निसर्गाकडे वळतो आहोत. निसर्गच आपला सखा, सोयरा, मित्र आहे. निसर्गाचे अनमोल वरदानच आपल्या जीवनाला एक ऊर्जा आणि प्रेरणा देणारे आहे. व या वनऔषधींचे मानवी आरोग्याला काय फायदे होतात याविषयीचे विवेचन त्यांनी केले.

या प्रकल्पाच्या मंजुरी बद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, सहसचिव भारत घोगरे पाटील यांच्यासह विविध अधिकारी व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!