spot_img
spot_img

तहसीलदारांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ नेवासा फाटा बंदला समिंश्र प्रतिसाद

नेवासा फाटा : ( जनता आवाज वृत्तसेवा ) :- नेवासा फाटा येथील वहिवाटीचा रस्ता खुला करुन देण्याचा आदेश देणाऱ्या नेवासा तहसिलदार संजय बिरादार यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ शुक्रवार (दि.१) रोजी नेवासा फाटा बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

तारापार्क व परिसरातील लोक वसतीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद करण्यात आल्यामुळे नागरीकांनी रस्ता रोको आंदोलन करुन रस्ता रोको केल्यानंतर कामगार तलाठी अण्णा दिघे यांनी पंचनामा करुन नेवासा तहसिलदारांनी रस्ता खुला करण्याचा आदेश दिलेला होता या आदेशानंतर जागा मालकांनी तहसिलदारांना आपण दिलेल्या आदेशाची लेखी देण्याची मागणी घुले यांनी केली होती तहसिलदार बिरादार यांनी लेखी न दिल्यामुळे झालेल्या राड्यातून नेवासा तहसिलदारांनी मारहण झाल्याची फिर्याद नेवासा पोलीस ठाण्यात नोंदविली गेली होती त्यामुळे नेवासा फाटा येथे शुक्रवार (दि.१) रोजी नेवासा फाटा बंदला व्यापाऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद मिळाला नेवासा फाटा परिसरात काही दुकाणे चालू तर काही दुकाणे बंद ठेवण्यात आल्यामुळे या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळालेला दिसू आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!