spot_img
spot_img

जालना लाठीचार्ज निषेधार्थ बंदच्या हाकेला टाकळीभान येथे शंभर टक्के प्रतिसाद

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा):- जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज दिनांक ३ रोजी टाकळीभान येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.

टाकळीभान येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आज टाकळीभान बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या हाकेला सर्व व्यापार्‍यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद  दिला.सकाळपासूनच गावातील सर्व व्यवहार पूर्णपणे बंद होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता.

अंतरावली सराटी जिल्हा जालना येथे मराठा आरक्षण संबधाने घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने समाजमाध्यमावर येणाऱ्या अफवावर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियावर वादग्रस्त कोणतीही पोस्ट अगर व्हिडिओ व्हायरल करू नये. सदर बाबत सायबर विभागचे कटाक्षाने लक्ष असून आपणास काही माहिती असल्यास तात्काळ आम्हास संपर्क करावा व माहिती द्यावी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी. कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन श्रीरामपूर तालूका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी केले आहे.

बंदच्या हाकेला टाकळीभान येथे शंभर टक्के प्रतीसाद मिळाला असून आज गावात सर्व भागात बंद पाळून झालेल्या घटनेचा निषेध करण्यात आला.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!