टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा ) :-श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील महानुभाव आश्रम श्रीकृष्ण ज्ञान मंदिरात सालाबादप्रमाणे श्रीकृष्ण जन्मोत्सव बुधवार दि. ०६/०९/२०२३ रोजी रात्री १२ वा. साजारा करण्यात येणार आहे.
श्रीकृष्ण जन्मोत्सवा निमित्त रात्री ८ ते ११ श्री दत्त भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम व रात्री ११ ते १२ जन्मअख्यान अध्याय होवून जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे. गुरूवार दिनांक ७/९/२०२३ रोजी दुपारी १२ ते रात्री ९ या दरम्यान गोपाळकाला व भोजन आयोजित केलेले आहे तरी सर्व भाविक भक्तानी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन
भाविक भक्तांनी तिर्थप्रसादास व भोजनास उपस्थित रहावे असे आवाहन मुरलीधर बाबा दर्यापूरकर,अनाथ मुलांचे आश्रम व्यवस्थापिका सुनंदाबाई शेवलीकर, विजय दर्यापुरकर, कविता दर्यापूरकर, कु. ईश्वरी शेवलीकर यांनी केले आहे.



