नेवासा फाटा( जनता आवाज वृत्तसेवा ):- जालना जिल्ह्यातील अंतरावली सराठी येथे मराठा आक्रोश मोर्चावर झालेल्या लाठीहल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने नेवासाफाटा येथे छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावरआज सोमवार दिनांक ४ रोजी आयोजित करण्यातआलेल्या रास्ता रोकोला मराठा समाजा बरोबरच सर्वजाती धर्माच्या नागरिकांनी उपस्थित राहून मराठा समाजाला आपला पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी मराठा मोर्चाचे समन्वयक गणेश निमसे,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी माळवदे, शिवसेनेचे शाखाप्रमुख गणेश झगरे, पीआर जाधव, गणेश चौगुले बालेन्द्र पोतदार, रावसाहेब घुमरे, सुदाम कापसे, बन्सी सातपुते आदींनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही तर आपला लढा असाच सुरु ठेवणार असल्याचे सांगितले. यावेळी रास्ता रोको सुरु असताना अंबुलन्स आल्याने मराठा बांधवांनी त्वरित रस्ता मोकळा करून दिल्याने रुग्णाच्या नातेवाईकांनी आपले आभार व्यक्त केले.
यावेळी नारायण लष्करे ,मुन्ना चक्रनारायण,सचिन नागपुरे,धनंजय काळे, राजू काळे,निरज नांगरे, माऊलीदेवकाते ,सतीश निपुंगे यांसह सर्व समाज बांधवांची मोठ्याप्रमाणात उपस्थिती होती.



