3.8 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

सात्रळ महविद्यालयात “गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा 

 

साञळ दि.६ ( जनता आवाज वृत्तसेवा ):- लोकनेते पद्यभुषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सात्रळ येथे ट्रेनिंग प्लेसमेंट सेल आणि रसायनशास्त्र विभाग यांचेवतीने गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

याळेळी रिसर्च असोसिएट सिनजिन, हैदराबाद येथील तुषार घोलप आणि रिसर्च असोसिएट ,अर्जन फार्मा, र्बेंगलोर चे अक्षय घोलप हे उपस्थित होते .या कार्यशाळेमध्ये गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस या विषयावर सर्वांगीण अर्थाने विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अक्षय घोलप यांनी विद्यार्थ्यांना गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस विषयी सखोल मार्गदर्शन केले.ग्रामीण भागातील विद्यार्थी अत्यंत हुशार आणि मेहनती आहे फक्त त्याचा आत्मविश्वास वाढणे गरजेचे आहे. तसेच विद्यार्थ्याने कॉर्पोरेट क्षेत्रात लागणारी कौशल्य हि शिक्षण घेतानाच विकसित करावी असे प्रतिपादन श्री अक्षय घोलप यांनी केले.

या कार्यशाळेमध्ये तुषार घोलप यांनी गुड लॅबोरेटरी प्रॅक्टिसेस या विषयावर अतिशय सविस्तरपणे मार्गदर्शन केले. तसेच न्यूक्लियर मॅग्नेटिक रेझोनन्स या इन्स्ट्रुमेंट विषय अतिशय सखोल माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याची कार्यपद्धती, हाताळण्याची लागणारी कुशलता, त्यासाठी कुठले ट्रेनिंग अपेक्षित आहे ? काय स्किल लागते ? या सर्व गोष्टींची सविस्तरपणे विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या कडून येणाऱ्या प्रश्नांना अतिशय सुंदर पद्धतीने उत्तरे देण्यात आली.

फक्त ग्रॅज्युएट न होता पुढे आपल्याला चांगलं करिअर करायचं असेल आणि अडचणींचा सामना करायचा असेल तर त्यासाठी फार्मा कंपनी मध्ये वापरण्यात येणारे इन्स्ट्रुमेंट चे ज्ञान असणे आवश्यक आहे तसे ते आपल्याला हाताळता येणेही आवश्यक आहे आणि म्हणून यासाठी प्रत्येक मुलाने ट्रेनिंग घेणे अत्यंत गरजेचे आहे.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अतिशय उस्फुर्त पणे आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. श्री. तुषार आणि श्री. अक्षय हे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी असल्यामुळे त्यांनी आपले महाविद्यालयातील अनुभव सुद्धा मोकळेपणाने सांगितले.अत्यंत सुंदर पद्धतीने हि कार्यशाळा संपन्न झाली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पांडुरंग मुसमाडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.स्वाती मूसमाडे यांनी दिला प्राचार्य डाॅ. प्रभाकर डोंगरे , उपप्राचार्य डॉ.दिपक घोलप यांनी विद्यार्थ्यांना कार्यशाळा आयोजित करण्यामागचा उद्देश समजून सांगितला.सुत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर आणि प्रा. शरयू दिघे यांनी केले. ट्रेनिंग प्लेसमेंट सेल च्या समन्वयक सौ. छाया कार्ले यांनी आभार मानले.

यासाठी महाविद्यालयाचे रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.अमित वाघमारे, डॉ.शिवाजीराव पंडित , डॉ. विजय कडनोर,प्रा. वाघे एस.बी.,प्रा.हारदे डी .डी ,प्रा. सोनाली मुन्तोडे , प्रा. प्रियांका तांबे, प्रा. सोनाली पारधे ,प्रा. प्रियांका गागरे , यांचे सहकार्य लाभले.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!