8.7 C
New York
Saturday, November 23, 2024

Buy now

spot_img
spot_img

साकुरी येथे आयुष्यमान भारत कार्ड योजनेचा शुभारंभ

राहाता( जनता आवाज वृत्तसेवा ):-प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्रधानमंत्री जण आरोग्य योजने अंतर्गत आयुष्यमान भारत योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कार्ड वाटप योजनेचा शुभारंभ साकुरी येथे करण्यात आला आहे.

हर घर स्वास्थ या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील प्रोजेक्ट अंतर्गत राहाता तालुक्यातील साकुरी येथे नामदार श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्ननाने या योजनेचा शुभारंभ करण्यात आला या योजने अंतर्गत या कार्ड लाभ धारकाला 5 लाख रुपये पर्यंत मोफत दवाखाना इलाज होणार आहे तसेच या कार्ड मार्फत गंभीर आजारावरील ऑपरेशन सुद्धा मोफत केले जाणार आहे या कार्ड मार्फत हृदय रोग ऑपरेशन,मेंदू ऑपरेशन,कॅन्सर ऑपरेशन,या प्रकारच्या अनेक आजारांवर या कार्ड मार्फत मोफत उपचार करणे आता सुलभ होणार आहे या कार्ड मुळे नागरिकांचा वेळ व पैसे सुद्धा वाचणार आहे साकुरी येथील सेतू कार्यालय मध्ये या योजनेचा आज शुभारंभ करण्यात आला यावेळी या योजनेचे पाहिले लाभार्थी म्हणून श्री अभिलाष पाटोदी, धीरज मंडलिक,विनायक तरटे, राहुल जाधव, शिवाजी गोरे,संतोष तरकसे,शाहिद पठाण आदी उपस्थित होते तरी सर्व पात्र लाभार्थी यांनी आपले आयुष्यमान भारत कार्ड काढून घ्यावे असे आवाहन शासनामार्फत करण्यात आले आहे

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!