8.7 C
New York
Sunday, November 24, 2024

Buy now

spot_img
spot_img

भारत राष्ट्र समिती पक्षाचा मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा 

श्रीरामपूर( जनता आवाज वृत्तसेवा ): – भारत राष्ट्र समिती पक्षाच्या वतीने माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना जिल्ह्यातील आंतरवली (सराटी) येथील उपोषणकर्त्यांवर पोलीसांकडून झालेला अमानुष लाठीमाराचा निषेध करुन मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी मागणी श्रीरामपूरचे उपविभागीय अधिकारी श्री.किरण सावंत पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. याप्रसंगी हिम्मतराव धुमाळ, नाना पाटील, सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, सौ.सुनिताताई गायकवाड, गणेश छल्लारे, शरद देवकर यांची मराठा समाजाला आरक्षण मिळणेबाबत व आंदोलनास पाठिंबा असल्याची भाषणे झाली.

उपविभागीय अधिकारी श्री.पाटील यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जालना जिल्ह्यातील (ता.अंबड) आंतरावली (सराटी) येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी श्री.मनोज जरांगे पाटील यांचे नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. सदर आंदोलनास भारत राष्ट्र समितीच्या वतीने आम्ही जाहीर पाठींबा देत आहोत. मराठा समाजाचे आंदोलन हे सनदशीर व शांततेच्या मार्गाने आंदोलन चालू असतांना आंदोलकांवर पोलीस बळाचा वापर करुन अमानुषपणे लाठीमार केला व अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. यात अनेक वयोवृध्द, महिला, तरुण व लहान मुले जखमी झाले. सदर घटना ही मानवतेला काळीमा फासणारी असून अशा प्रकारे आंदोलन चिरडणे निषेधार्ह आहे. सदर घटनेचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत.

तसेच राज्यात मराठा समाज हा बहुसंख्यांक असून हा समाज मुख्यत्वे शेती करणारा असल्याने त्याची ‌‘कुणबी’ ही मूळ ओळख आहे. हा समाज पारंपारीक दृष्ट्या ‌‘कुणबी’ म्हणूनच ओळखला जातो. त्यामुळे मराठा समाज सधन असल्याचा गैरसमज आहे. शेती मोडकळीस आल्याने मराठा समाज आर्थिक दुर्बलतेत आहे. असे असतांना मराठा समाजाला आरक्षण नाकारणे योग्य ठरत नाही. तेव्हा शासनाने मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे व निवेदनातील मागण्या शासन दरबारी कळवाव्या, असे म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी पुंजाहरी शिंदे, ॲड्.सुभाष चौधरी, ज्ञानदेव साळुंके, हिम्मतराव धुमाळ, सिद्धार्थ मुरकुटे, भाऊसाहेब हळनोर, भाऊसाहेब उंडे, मयुर पटारे, सोन्याबापू शिंदे, दशरथ पिसे, किशोर बनसोडे, आदिनाथ झुराळे, यशवंत रणनवरे, प्रफुल्ल दांगट, वाय.जी.बनकर, रामभाऊ कसार, ज्ञानेश्वर शिंदे, अमोल कोकणे, गणेश भाकरे, भाऊसाहेब कहांडळ, दत्तात्रय नाईक, बाबासाहेब ढोकचौळे, काशिनाथ गोराणे, सुभाष पटारे, दिपक काळे, रामदास पटारे, बबनराव उंडे, रोहन डावखर, सुनिल बोडखे, महेश पटारे, गीताराम खरात, भागवतराव पटारे, बाळासाहेब राऊत, शिवाजीराव मुठे, शिवाजीराव शिंदे, संजय लबडे, राहुल बनकर, वसंत देवकर, प्रविण फरगडे, संपतराव मुठे, बबनराव आसने, निवृत्ती थोरात, राधाकिसन उंडे, अच्युतराव बडाख, संदीप डावखर, ॲड्.पृथ्वीराज चव्हाण, हरिदास वेताळ, रसूल पठाण, बाळासाहेब वेताळ, संतोष वेताळ, बाबासाहेब पवार, संदीप शेरमाळे, शहाजी वडितके, विलास कदम, संदीप वेताळ, रमेश ढोकचौळे, अमोल ढोकचौळे, रावसाहेब आसने, प्रशांत दांगट, रंगराव रंजाळे, सोपानराव नाईक, विजयराव ताके, दादासाहेब खर्डे, सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर नांगळ, वृद्धेश्वर कुऱ्हे, ठकसेन खंडागळे, सखाराम कांगुणे, भास्करराव गायके, विकास बोर्डे, रविंद्र पवार, प्रताप बोर्डे, रविंद्र बनकर, सखाहरी शिंदे, भैरव कांगुणे, अशोक पवार, कल्याण लकडे, सोमनाथ पारखे, जमशेद पटेल, उद्धव आहेर, नितीन खंडागळे, बाळासाहेब शिंदे, प्रविण गवारे, सचिन काळे, अशोक काळे, भाऊसाहेब पटारे, भाऊसाहेब कोकणे, ज्ञानदेव पवार, सुभाष मोरगे, साहेबराव गायकवाड, राजेंद्र गायकवाड, दिपक झुराळे, रंगराव रंजाळे, आशिष दोंड, कैलास भागवत, अरुण भराडी, इम्रान शेख, संजय मोरगे, पंकज देवकर, नानासाहेब निकम, दत्तात्रय राऊत, राजेंद्र काळे, बाळासाहेब भांड, वसंत पुजारी, सुदेश झगडे, रविंद्र झरेकर, कैलास अबक आदी उपस्थित होते.

 

 

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!