9.1 C
New York
Tuesday, October 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

टाकळीभान येथील श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात गोकुळाष्टमी उत्सव साजरा.

टाकळीभान, ( जनता आवाज वृत्तसेवा  ) :-श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील पुरातन यादव कालीन श्री. विठ्ठल रूख्मिणी मंदिरात गोकुळाष्टमी  उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

उत्सवानिमित्त रात्री ९ ते ११.३० या दरम्यान भजन करण्यात आले त्यानंतर श्रीकृष्ण जन्म अख्यान पोथीचे वाचन करून १२ वाजता फुलांची उधळन करून व पाळण्याची दोरी ओढून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. पोथीचे वाचन पुरोहित संजय देवळालकर यांनी केले.जन्मानंतर खिरापत, पंजीरीचा प्रसाद वाटण्यात आला.

यावेळी मंदिराचे पुरोहित विजय देवळालकर, वासुदेव साबळे, गोकुळ भालेराव, रोहिदास पटारे, सुरेश बनकर, राजेंद्र नवले, अशोक शेळके, साहेबराव बोडखे, रामनाथ पंडीत, दत्तात्रय पटारे, प्रकाश गलांडे, खंडेराव गवांदे,भाऊसाहेब पटारे,मंदिराचे विश्वस्त नानासाहेब लेलकर, लक्ष्मण भालसिंग तसेच वैशाली देवळालकर,मृणाल देवळालकर,वसुंधरा देवळालकर, सुमन मुळे, मिराबाई बडाख, ताई खंडागळे, छाया खंडागळे, लहानबाई बोडखे, जमुना गायकवाड, वंदना गलांडे उपस्थित होते.

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!