राहुरी ( जनता आवाज वृत्तसेवा ):- राहुरी तहसीलदार सौ पुनम दंडीले मॅडम यांनी ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या आंदोलनापासून आंदोलकांना परावृत्त करण्यासाठी आंदोलक प्रमुख लांबे,मुळापाटबंधारे राहुरी उपविभाग अभियंता श्री.विलास पाटील,व उपकार्यकारी अभियंता विद्युतमहावितरण श्री.तान्हाजी भोर यांना होणाऱ्या आंदोलनाच्या विषयावर चर्चेसाठी बोलावून बैठकीचे नियोजन केले असता संबंधित अधिकारी काही कारणास्तव बैठकीला येऊ शकले नाही परंतु सौ.पुनम दंडीले मॅडम यांनी फोनवर संपर्क करून त्यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले आम्ही पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिलेला आदेशाप्रमाणे पत्र पाठवले परंतु आम्ही मुळा उजवा कॅनल वरील कुठल्याही शेतीपंपाचा विद्युत पुरवठा खंडित केलेला नाही,यावर तहसिलदार दंडीले मॅडम यांनी लेखी पत्र मागितले असता विद्युत महावितरण राहुरी उपकार्यकारी अभियंता व मुळा पाटबंधारे उपविभाग अभियंता यांनी तहसीलदार यांना त्यांच्या अधिकाराच्या मर्यादित लेखी पत्र दिले, दिलेल्या पत्रात समाधानकारक लेखी नसतानाही सध्याची वस्तुस्थिती पाहता लांबे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित करण्याची संमती दिली,
यावर तहसीलदार सौ.पुनम दंडीले मॅडम यांनी आंदोलकांचे आभार मानले,
लांबे यांनी पुढे बोलताना सांगितले की चालू वर्षी खरीप हंगामात अतिअल्प पाऊस झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील पेरण्या होऊ शकल्या नाही त्यातून ज्यांना अल्प प्रमाणात पाऊस झाला व थोडेफार पाणी होते त्यांनी पेरणी केली तीही जळून चाललेली असल्यामुळे मुक्या जनावरांचा चा-याचाही प्रश्न निर्माण झाल्यामुळे आम्ही दिनांक २२ ऑगस्ट रोजी मुळा उजवा कॅनलला त्वरित पाणी सोडा ही मागणी केली असता त्यावर २८ ऑगस्ट रोजी पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली टंचाई आढावा बैठकीत १ सप्टेंबर रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला परंतु त्यातच ५ सप्टेंबर पासून पुढे २० दिवस कॅनल वरील शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येईल असाही उल्लेख आदेशामध्ये निदर्शनात आल्याने या विरोधात आम्ही सध्याच्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करता त्वरित दिनांक १ सप्टेंबर रोजी निवेदन देऊन कॅनल वरील शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्यास ८ सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला,परंतु ५ सप्टेंबर पासून आज तीन दिवसात मुळा पाटबंधारे विभाग व विद्युत महावितरण यांनी वैयक्तिक कॅनल वरील एकही शेती पंपाचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे आढळून आले नाही व तशी तक्रार एकही शेतकऱ्यांनी आमच्याकडे केली नाही,आम्हीही अनेक शेतकऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी कॅनल वरील शेती पंप चालू असल्याचे सांगीतले व तसे निदर्शनास आले,त्या अनुषंगाने आम्हाला सध्या स्थितीत आंदोलन करणे योग्य वाटत नसल्याने राहुरीचे तहसीलदार सौ पुनम दंडीले मॅडम यांच्या विनंतीला मान देऊन ८ सप्टेंबर रोजी होणारे आंदोलन स्थगित केलेले आहे,तरी मुळा उजवा कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी याची नोंद घ्यावी,परंतु मुळा उजवा कॅनल वरील शेतकऱ्यांना शेती पंप चालवण्यास त्रास दिल्यास पुन्हा आंदोलन करू असा इशारा प्रहार चे राहुरी तालुकाध्यक्ष शेतकरी नेते सुरेशराव लांबे पाटील यांनी शासन व प्रशासनाला दिला,