राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा ):-राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथील बंदिस्त गटारीचे काम हे होऊन सुद्धा गावातील सांडपाणीचे पाणी हे दैनंदिन वापर करणाऱ्या रस्त्यावर जमा होऊन रस्त्यावर वाहत असून मोठ मोठे खड्डे होऊन पाणी जमा झालेले आहे.
सविस्तर माहिती अशी. कि, राहूरी तालुक्यातील डोंगराळ, दुर्गम आणि अनेक घटकापासून वंचित असलेल्या शेरी चिखलठाण हे तालुक्यापासून सुमारे ३० ते ३५ कि. मी. अंतरावर असून या गावातील राजकीय पुढारी आणि स्थानिक पुढारी हे फक्त मतदानपुरतेच येथील जनतेचा वापर करून हवेवर सोडून देतात येथील विकास कामे ही नावापूरती दिसत आहे. आपल्या भारत देशामध्ये सध्या स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला असून एकीकडे भारत सरकार आभा कार्ड बनवून नागरिकांचे आरोग्य परिपूर्ण कसे राहील याची जबाबदारी उचलत असून दुसरीकडे शेरी. चिखलठाण येथील ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत या जनतेच्या कामाकडे कानाडोळा करत आपली मनमानी करत आपले कर्तव्य आणि. नियम धाब्यावर मांडून चिखलठाण गावातील आरोग्याशी खेळणे चालू आहे. ग्रामसेवकाला वारंवार कल्पना देऊनही ग्रामसेवकाची मुजोरी कमी होत नसून काही राजकीय पुढारी हे ग्रामसेवकांच्या डोक्यावर हात ठेवत असल्याने शेरी. चिखलठाण येथील ग्रामसेवक हे कामात दुर्लक्ष करून आपली मनमानी करत असल्याने येथील जनतेला वेठीस धरत असल्याने अनेक कामे ही अपुरी असल्याने या जनतेला आर्थिक. व मानसिक समस्यांना तोंड दयावे लागत आहे.
चिखलठाण येथील सांडपाणी हे रस्त्यावर जमा होऊन वाहत असल्यामुळे येथे डास, मच्छर होऊन स्थानिक नागरिक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि मुस्लिम समाजाची मशीद असल्याने दिवसातून पाच वेळेस मुस्लिम बांधवाना नमाज पाठणासाठी याच पाण्यातून यावे लागते आणि प्रवासी जनतेला सुद्धा याच दूषित पाण्यातून जावे लागते, या दूषित पाण्यामुळे आजार उदभवण्याचे चित्र दिसत आहे. राजबेट येथील अंगणवाडी चा पाण्याचा प्रश्न हा अनेक वर्षांपासून मार्गी लागला नसून येथील अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे . अंगणवाडी शेरी येथील पाण्याचा प्रश्न हा सुरळीत झालेला नाही, वारंवार मागणी करून पाणी प्रश्न मार्गी लावलेला नसल्याने येथील लहान चिमुकले यांनापाणी पिण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी यांना नेहमी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामसेवकांना वारंवार मागणी करूनही येथील प्रश्न मार्गी लागला नाही. अशी अनेक कामे असून येथील कामे ही पूर्ण करावी अशी. मागणी ही चिखलठाण शिवसेना कार्येकर्ते तालुका अध्यक्ष सुभाष बाचकर, महादू काळनर, साहेबराव बर्डे, बाळू बर्डे, चंदर तमनर,रोहिदास बर्डे, संजय बर्डे, दीपा पिंपळे आणि गावातील समस्त नागरिकांनी सह्या केल्या असून निवेदन दिले आहे.