राहाता ( जनता आवाज वृत्तसेवा ):-वयोश्री योजनेचा सर्वाधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात देशात नंबर वन ठरलेल्या खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी एडीप योजने अंतर्गत सामाजीक अधिकारिता शिबिर व निशुल्क सहायक उपकरण वितरणात सुद्धा बाजी मारली आहे. राहता शहरातील साई विठ्ठला लॉन्स येथे घेतलेल्या दिव्यांग बांधवांसाठी मोफत सहाय्यक उपकरण वितरण कार्यक्रम प्रसंगी सुमारे दीड हजार लाभार्थ्यांना मोफत साहित्याचे वितरण केले आहे.
खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते सहाय्यक उपकरणाचा स्वीकार करतांना लाभार्थ्यांचे चेहऱ्यावर मोठा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता तीन चाकी सायकल श्रवण यंत्र, ब्रेल लिपीतील साहित्य,बॅटरीवरील सायकल यासह विविध दिव्यांग बांधवांसाठी उपयुक्त असलेल्या सहाय्यक उपकरणांचे वितरण करण्यात आले खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या साहित्य वाटप प्रसंगी दिव्यांग बांधवांशी अत्यंत जिव्हाळ्याने व अस्थेवायिकपणे संवाद साधला आपणास उद्भवणाऱ्या समस्या अथवा लागणाऱ्या गरजा याबाबत केव्हाही संपर्क साधा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.
दिव्यांग बांधवांना समाजातील प्रत्येक माणसाने आपल्या कुटुंबातील घटक मानून माणुसकीचा ओलावा व प्रेमाचा जिव्हाळा देणे आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले या कार्यक्रमाप्रसंगी भाजपचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर,श्री गणेश कारखान्याचे माजी अध्यक्ष मुकुंदराव सदाफळ,ॲड रघुनाथ बोठे,भाऊसाहेब जेजुरकर, सोपान सदाफळ, नितीन कापसे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ सुहास वाबळे,विजयराव कातोरे,दीपक रोहोम, वीरभद्र देवालय ट्रस्टचे अध्यक्ष साहेबराव निधाने, राजेंद्र निकाळे सर ,बाळासाहेब डांगे,अशोक जमधडे, सतीश बावके, सचिन मुरादे,वैभव डांगे, नगरसेवक सलीम भाई शाह ज्ञानेश्वर चौधरी नगरसेवक भीमराज निकाळे बाळासाहेब डांगे अशोकराव जमदाडे संजय सदाफळ सुरेशराव गाडेकर ज्ञानेश्वर सदाफळ अशोकराव वाघ यांच्या सह सर्व पदाधिकारी, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या सर्वच योजना जिल्हात महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबतांना विविध योजना लोककाभिमुख होण्यासाठी सबका साथ सबका विकास यातुन सर्वानाच आधार देण्याचा प्रयत्न खा.विखे पाटील यांनी करतांना कोणतीही गैरसोय होऊ नये यांनी ही काळजी घेतली जाते.