23.6 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

विद्यार्थी आणि बेजबाबदार प्राध्यापकांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर नगर जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा – प्रथमेश जोशी

श्रीरामपूर ( जनता आवाज वृत्तसेवा ):- बेलापुर येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला गावातील अल्पवयीन आरोपी वारंवार त्रास देत होते. ही बाब तिने प्राध्यापकांना सांगूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच त्या चौघांचे धाडस वाढुन असे प्रकार वाढत आहेत. यास महाविद्यालयीन प्रशासन जबाबदार आहे, असा आरोप करीत संबंधित विद्यार्थी आणि बेजबाबदार प्राध्यापकांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उत्तर नगर जिल्हा शाखेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रथमेश जोशी यांनी दिला आहे.

विद्यार्थी परिषदेच्या वतीने काल बेलापुर येथील जे. टी. एस. कनिष्ठ महाविद्यालयापुढे कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वाराजवळ घोषणाबाजी करत आंदोलन केले.

शिक्षण घ्यायला येणाऱ्या विद्यार्थिनींची छेडछाड होणाऱ्या घटना अतिशय निंदनीय आणि गंभीर असून संबंधित विद्यार्थी आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करावी,अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा प्रथमेश जोशी यांनी दिला आहे.

यावेळी सदर प्रकरण आणि सुरक्षा प्रश्र्नी प्राचार्य पुजारी यांना घेराव घालून जाब विचारण्यात आला.त्यावेळी दोन दिवसात मागण्यांबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.त्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले, असेही जोशी यांनी सांगितले.

पाठीशी घालण्याचे प्रकार न थांबल्यास व्यापक आंदोलन याआधी गुणवाढ प्रकरणी आरोपी एका प्राध्यापकाला तक्रारदार विद्यार्थ्यांनीच्या घरी नेऊन विभाग प्रमुखाने प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न करुन पाठीशी घातले. त्यानंतर विद्यार्थिनीने गुन्हा दाखल केला होता. राज्यभर पोहोचलेल्या या गंभीर प्रकरणी व्यवस्थापनाकडून ठोस कारवाईची अपेक्षा होती.मात्र तसे काहीही न घडता प्रकरण दाबण्यात आले. तसेच त्यानंतर आलेल्या कोरोनामुळे या प्रकरणी दुर्लक्ष झाल्यानेब त्याना जीवदान मिळाले.आताही या आरोपी विद्यार्थ्यांबाबत तसेच घडले.विद्यार्थी व शिक्षकांना पाठीशी घातल्याने बेजबाबदारपणा आणि धाडस वाढत आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात असे प्रकार थांबले पाहिजेत. अन्यथा विद्यार्थी परिषदेला व्यापक आंदोलन उभारावे लागेल.

प्रफुल्ल डावरे (माजी श्रीरामपूर तालुका प्रमुख अ. भा. वि. प.)

 

यावेळी अभविपचे वैष्णव भारोडकर, कानिफनाथ विधाते, ऋषिकेश खैरे, हर्षल जाधव, करण गोसावी, गोविंद बनभेरु, सार्थक मुंडलीक, सूरज बडे, प्रशांत खैरनार, महेश कुंभकर्ण, सुरज यादव, रामभरत यादव, राजेश्वर बारस्कर, निलेश हरदास, सचिन कणसे, निखिल मुंडलिक यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलन प्रसंगी सहभागी होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!