लोणी दि.४( जनता आवाज वृत्तसेवा):-राहुरी तालुक्यातील निंभेरे येथे कृषी महाविद्यालय लोणी येथील कृषी दूतांचे आगमन झाले आहे . यावेळी पंचक्रोशितील शेतकऱ्यांनी या कृषीदूतांचे स्वागत केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे व महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित कृषी महाविद्यालय लोणी येथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. संस्थेच्या कृषी शिक्षण संचालिका व कृषी महाविद्यालय लोणी च्या प्राचार्या डॉ. शुभांगी साळोखे, कार्यक्रम समन्वयक प्राचार्य रमेश जाधव,कार्यक्रम अधिकारी रवींद्र दसपुते आणि प्रा. डॉ. दिपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत ज्ञानेश्वर थोरात, प्रदीप गावडे , अभिषेक पाटील, गणेश पिसाळ,वैभव चव्हाण, विश्वजीत पवार हे श्री क्षेत्र निंभेरे येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करत आहेत.
दरम्यान याप्रसंगी ग्रामपंचायत निंभेरे चे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, माजी सरपंच , सोसायटी चेरमन , प्रतिष्ठित ग्रामस्थ व परिसरातील प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
कृषी शिक्षणाच्या माध्यमातून हे कृषीदूत येथील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती , बीजप्रक्रिया ,गांडूळखत उत्पादन , चारापिके , दुग्ध व्यवसाय, बायोगॅस आदी बाबत माहिती देणार आहेत .