लोणी दि. 9 (जनता आवाज वृत्तसेवा):- लोकनेते पद्यभुषण डाॅ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या लोणीच्या कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वतीने अकोले तालुक्यातील धामणगाव आवारी येथे ‘ग्रामीण महिलांसाठी कृषी व्यवसायाच्या संधी ‘ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादाला विविध बचत गटाच्या शंभरहून अधिक महिलांनी उपस्थिती नोंदवली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करण्यात आले.कार्यक्रमाचे समन्वयक डॉ अनिल बेंद्रे यांनी प्रास्ताविक करून मार्गदर्शकांची ओळख करून दिली. अगस्ती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा निताताई आवारी यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
अगस्ती महिला प्रभाग संघाच्या अंतर्गत येणाऱ्या बचत गटांची ओळख करून देताना या सर्व गटातील महिला घरची जबाबदारी सांभाळून विविध व्यवसायात उतरत आहेत. महिलांमध्ये समन्वय उत्तम आहे आणि नवीन करण्याची धडपड आहे अशी माहिती अगस्ती महिला प्रभाग संघाच्या अध्यक्षा निताताई आवारी यांनी यावेळी दिली.
या परिसंवादात लोणी येथील कृषी महाविद्यालयाचे प्रा. रमेश जाधव यांनी महिलांसाठी कृषी व्यवसायात असलेल्या संधी याबाबत इत्यंभूत माहिती देत मार्गदर्शन केले आणि महाविद्यालयाच्या डॉ. ज्योती झिरमिरे यांनी शेतकरी उत्पादक कंपनी याबाबत मार्गदर्शन करून महिलांना प्रोत्साहित केले. दोन्ही मार्गदर्शकांनी महिलांच्या शंकांचे समाधान केले. प्राचार्य डॉ.किरण गोंटे यांनी महिलांनी सक्षमपणे व्यवसायात उतरून विकास साधावा असे अवाहन केले.
याप्रसंगी दिशा महिला ग्राम संघ धामणगाव आवारी च्या निताताई आवारी,सौ.अरुणा पोखरकर,सौ.रुपाली आवारी,अलका आवारी,सारीका आवारी, रुक्मिणी गावंडे,अर्चना आवारी,स्वाती पापळ,पुजा आवारी उपस्थित होत्या.
याप्रसंगी जय हनुमान स्वयंसहायता महिला बचत गटाच्या वतीने विविध रानभाज्यांची ओळख करून देण्यात आली.